Top Post Ad

अग्निसुरक्षा मान्यतेच्या अर्ज नमुन्यांमध्ये महानगरपालिकेकडून सुधारणा

    महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००६ (सुधारणा २०२६) अन्वये “तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता” ही इमारतीच्या आराखड्याच्या मंजुरीच्या टप्प्यावर देण्यात येणारी शिफारस असून, ती “अग्निसुरक्षा प्रमाणपत्र” नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी संबंधित नमुन्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने नवीन / सुधारित बांधकाम, वाढीव / बदल बांधकाम, दुरुस्ती प्रकरणे, अंतिम अग्निसुरक्षा मान्यता तसेच तात्पुरत्या बांधकामासाठीचे सुधारित अर्ज नमुने तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे.   

महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००६ (सुधारणा २०२६) अन्वये, “तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता” (Provisional Fire Safety Approval) ही इमारतीच्या आराखड्यास मंजुरी प्रदान करताना व प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ होण्यापूर्वी, अधिनियम तसेच त्याअंतर्गत विहित नियमांनुसार आवश्यक असलेल्या अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजनांच्या अनुपालनाबाबत देण्यात येणारी शिफारस आहे. तथापि, “तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता” ही प्रत्यक्षात केवळ शिफारसीय स्वरूपाची असताना, ती “अग्निसुरक्षा प्रमाणपत्र” (Fire Safety Certificate) म्हणून ग्राह्य धरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, तात्पुरत्या अग्निसुरक्षा मान्यतेचे स्वरूप, उद्देश तसेच तिची कायदेशीर मर्यादा व व्याप्ती निर्विवादपणे स्पष्ट होण्यासाठी संबंधित नमुन्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. सदर बदलाच्‍या अनुषंगाने उपरोक्‍त अग्निसुरक्षा मान्‍यता त्‍यातील मुद्दयांअन्‍वये व अटीशर्तींच्‍या अनुषंगाने देण्‍यात येतील.  

याबाबतचे सुधारित नमुने तयार करण्‍यात आले आहेत. नवीन / सुधारित बांधकामासाठी (N.C.O.) तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, वाढीव / बदल बांधकामासाठी (A.A.O.) तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, वाढीव / बदल बांधकामातील दुरुस्तीसाठी (A.A.A.) तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, नवीन / सुधारित बांधकामातील दुरुस्तीसाठी (N.C.A.) तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, अंतिम अग्निसुरक्षा मान्यता व तात्पुरत्या बांधकामासाठी (T.C.) तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता आदी बदल करण्‍यात आले आहेत. वास्‍तुविशारद, परवानाप्राप्‍त सर्व्‍हेयर, विकासकांनी याची नोंद घ्‍यावी, असेआवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे. तसेच, सुधारित अर्ज नमुने महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर त्‍वरीत उपलब्‍ध करून द्यावेत, असे निर्देश श्रीमती जोशी यांनी दिले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com