Top Post Ad

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधुमित्र मधुसखी पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने देण्यात येणारे मधु मित्र व मधु-सखी पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने २० मे रोजी संभाजीनगर येथे छोटेखानी कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेस मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नित्यानंद पाटील, लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.), सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्त्यानंद पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग  उपस्थित होते. 


महाराष्ट्रातील मधमाशीपालन करणाऱ्या मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य व खादी ग्रामोद्योग मंडळाने २०२३ पासून ही योजना सुरू केली. २०२६ साठीच्या पुरस्कारासाठी ज्ञानेश्वर मलीले (लातूर), गणेश बुरकुल (संभाजीनगर), राजेंद्रदास बैरागी (बुलढाणा), श्वेता वायाळ (पुणे) यांची निवड करण्यात आली असे साठे म्हणाले. याशिवाय निवड समितीने श्री चंद्रकांत तरे (ठाणे), संजय मारणे (पुणे), दयावान पाटील (कोल्हापूर) व विद्यानंद आहिरे (जळगांव) यांचीही विशेष सन्मानासाठी निवड केली आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय राज्यात मधमाशीपालनास चालना देण्यासाठी विविध उपक्रम योजत आहे. यात मधमाशीपालन प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मध महोत्सव, मधु-मित्र व मधु-सखी पुरस्कार, मधाचे गाव आदींचा समावेश आहे. मधाचे गाव योजनेसाठी राज्य सरकारने १७ कोटी रुपयांची तरतूद केली असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात दहा गावांमध्ये काम सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत या गावांत ३४८ मधपाळांचे प्रशिक्षण, १७५० मधपेट्या, संरक्षण पोशाख, मध यंत्र व अन्य साहित्याचे वितरण झाले. या नावीन्यपूर्ण योजनेमुळे निसर्ग संवर्धन, मध उत्पादन वाढ, स्थानिक रोजगार निर्मिती व पर्यटन विकास या गोष्टी साध्य होतील, असे रवींद्र साठे म्हणाले

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या ६५ वर्षापासून कार्यरत आहे. मंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मध केंद्र योजना या योजनांची कार्यवाही होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार खादी मंडळाने "हर घर खादी घर घर खादी" ही घोषणा केली आहे असे साठे म्हणाले. त्यासाठी नागरिकांनी ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या गृह उपयोगी वस्तू विकत घ्याव्यात. यांत खादी वस्त्रे, कार्यालयीन वापरात हातकागदापासून बनविलेल्या वस्तू (चारिका, पेन्सिल), हातकागदापासून तयार झालेल्या गणेश मूर्ती, मध सौंदर्यप्रसाधने (तेल, साबण, शाम्पू) यांचा समावेश व्हावा. 


महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोम्योग मंडळ (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग). प्रशासकीय कार्यालय....१९/२१ मनोहरदास रस्ता, फोर्ट, मुंबई-४०० ००१,७ दुरध्वनी कार्यालयः ०२२-२२६१७६४१-२-३. ई-मेल hokvib@mskvib.org



जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ


२/ लक्ष्मी- विष्णू सदन, महर्षी कर्वे रोड, नौपाडा, नामदेव बाडी हॉल जवळ, ठाणे- ४०० ६०१ /फोनः २५३६६०७५ Email: dviothane@rediffmail.com


नवीन प्रशासकीय इमारत विंग ए, दूसरा मजला कक्ष क्र.२०८, पालघर बोईसर रोड, तालुका कोळेगाव, जिल्हा पालघर Email : dviopalghar@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, ठीकरुल नाका, रायगडबाजार, अलिबाग, रायगड- ४०२ २०१ / फोनः २२२६४२ Email: dvioraigad@rediffmail.com


द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेल रोड रत्नागिरी, रत्नागिरी- ४१५ ३१२ फोन २२२३७९ Email: dvioratna@rediffmail.com


शासकीय बॅरिक्स, तहसील कार्यालया जवळ, एस.डी.डी./३५-२ अ मु.पो. कुडाळ, सिंधुदुर्ग- ४१६ ८१२ / फोनः २२२२२० Email: dviosindhu@rediffmail.com


आय.टी.आय. जवळ उद्योग भवन सातपुर, नाशिक- ४२२००१ फोनः २३५२५३७Email: dvionasik@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, आय.टी.आय. जवळ नॅशनल हायवे समोर, जळगाव-४२५ ६०१ फोनः २५२९७१ Email: dviojalgaon@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, जमनगिरी रोड, फरिस्ट ऑफिसजवळ, धुळे- ४२४००१ फोनः २२४६२९२ Email: dviodhule@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, म.रा.वि.म. जवळ स्टेशन रोड, अहमदनगर- ४१४००१ फोनः २३५३४१० Email: dvionagar@rediffmail.com


नंदुरबार प्रशासकीय इमारत २/२३२- अ जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार ४२५ ४१२ फोनः २१००५३ Email: dvionandur@rediffmail.com


२४-ब, पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी जवळ, पुणे- ४११ ००३ / फोनः २५८११८५१ Email: dviopune@rediffmail.com


उद्योग भवन, मु.पो. विश्रामबाग, मिरज सांगली- ४१६ ४१५ / फोनः २६७११३० Email: dviosangli@rediffmail.com


उद्योग भवन, कलेक्टर ऑफिस जवळ, कोल्हापूर- ४१६ ००१ / फोनः २६५१२७१ Email: dviokolhapur@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, होटगी नाका, किनारा हॉटेल समोर, सोलापूर- ४१३ ००३ फोनः २६००१२८ Email: dviosolapur@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, एम. आय. डी. सी. कंपाऊंड, प्लॉट अ १३, सातारा ४१५००२ फोनः २२४६०१६ Email: dviosatara@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, सेन्ट्रल जेल समोर, उस्मानाबाद- ४१३५०१ फोनः २२२२३० Email: dviousmanabad@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक वसाहत, संभाजी नगर-४३१००१ / फोनः २३३४५६१


Email: dvioaurang@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, जकात नाका क्र-१८ परभणी- ४३१ ४०४ / फोन. २२२०१८ Email: dvioparbhani@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, एम.आय.डी.सी. एरिया, प्लॉट नं ७, जालना- ४३१ २०३ फोनः २२२०६२८ Email: dviojalna@rediffmail.com


२/एस ११, प्रशासकीय इमारत, हिंगोली ४३१ ५१३ /फोनः ६२२०४८३ Email: dviohingoli@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, बशीरगंज बीड- ४३१ ५१३ / फोनः २२२२५१७ Email: dviobeed@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, लातूर- ४१३००२ फोनः २२२०१४४ Email: dviolatur@rediffmail.com


शिवाजी नगर, औद्योगिक एरिया, नांदेड- ४३१ ६०१ / फोन:२२४०६७४ Email: dvionanded@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, कलेक्टर ऑफिसमागे, अमरावती- ४४४ ६०१ फोनः २६६२७६२ Email: dvioamravati@rediffmail.com


अरुणोदय बिल्डिंग, सुवर्ण नगर, शिवाजी हायस्कूल जवळ, बुलढाणा ४४३००१ फोनः २३३८८२ Email: dviobuldhana@rediffmail.com


द्वारा दागडीया सदन, तहसील कार्यालयाच्या बाजूला, सिव्हील लाईन, वाशिम ४४४ ५०२ फोनः २३३८८२ Email: dviowashim@rediffmail.com


३/ उद्योग भवन (पूर्व), लोहार रोड, यवतमाळ- ४४५००१ फोनः २२४४७९१ Email: dvioyavat@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, जुने कॉटन मार्केट, अकोला- ४४४ ००१ फोन:२४३०२५० Email: dvioakola@rediffmail.com


६/ जिल्हा उद्योग केंद्र, सिव्हील लाईन, नागपूर ४४० ००२ फोनः २५३४१४२ Email: dvionagpur@rediffmail.com


बाबा मस्तानशाहवार्ड, श्रीजांभूळकर निवास, भंडारा- ४४१ ९०४ फोनः ४२५२५२१ Email: dviobhandara@rediffmail.com


विठ्ठल भवन, दुर्गा चौक, कृष्णपुरा वार्ड गोंदिया- ४४१ ६०१ / फोनः २२३१७७Email: dviogond@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, एस.टी. स्टैंड मागे जिल्हा- चंद्रपुर ४४२ ४०१ / फोन:२२५२१४२ Email: dviochandra@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, कलेक्टर ऑफिस जवळ, वर्धा- ४४२००१ / फोनः २२४३३८२ Email: dviowardha@rediffmail.com


जिल्हा उद्योग केंद्र, कलेक्टर ऑफिस जवळ, गडचिरोली- ५५२ ६०५ / फोन: २२२२०५१ Email: dviogad@rediffmail.com


संचालक, मधुमक्षिका पालन केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला क्र ५, महाबळेश्वर, सातारा- ४१२ ८०६ / फोन: २६०२६४


Email: directorbees@gmail.com


संचालक, हातकागद संस्था, शेतकी महाविद्यालय आधार, के.बी. जोशी पथ, पुणे- ४११००५ फोन: २५५३८८३८/०९१ Email: dirhmpi@rediffmail.com


व्यवस्थापक, लोहारी सुतारी कार्यशाळा, डबलू ३ एम.आय. डी.सी. गोकुळ / शिरगाव, कोल्हापूर-४१६ २३६ / फोनः २३७२१७६ Email:


2026/05/19 11:06

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com