Top Post Ad

आता पोर्टलच्या माध्यमातून होणार ठाण्यातील बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन

 ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (Construction and Demolition - C&D) कचऱ्याचे  निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी  ठाणे महापालिकेने C&D Waste Management Portal विकसित केले असून या पोर्टलचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.


        मा. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदुषणसंदर्भातील Suo Moto PIL क्र 3/2023 मधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने Council on Energy, Environment and Water (CEEW) यांच्या सहकार्याने (Construction and Demolition - C&D) Waste Management Portal विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्र. मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच Council on Energy, Environment and Water (CEEW) संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

           या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या C&D कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत (Processing Plant) प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थान करता येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्याBuilding Plan Management System शी संलग्न असून, बांधकाम पारवानगी घेताना विकसकांना C&D Waste Fee भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक राहणार आहे.

           या प्रणालीमुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास मदत होणार असून, धूळ प्रदुषण व हवा प्रदुषण कमी करण्यासाठीही ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये बांधकामाचा कचरा साचून पाणी तुंबणे व पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यासही या पोर्टलची महत्वूपर्ण मदत होणार आहे.

           या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे शक्य होणार असून, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. ठाणे शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या शहरांमध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी गरज बनली आहे. तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रणालींमुळे कचऱ्याचे निर्मितीपासून प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावीपणे व्यवस्थापन करणे शक्य होईल आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल, बांधकाम कचऱ्याची योग्य विल्हेवाट केवळ हवा प्रदूषण कमी करण्यासाठीच नव्हे, तर पावसाळ्यात नाले तुंबणे, पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्यास प्रतिबंध करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. हे पोर्टल शहराच्या पर्यावरणीय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देईल असे CEEWच्या प्रार्थना बोरा यांनी नमूद केले.

           ठाणे महानगरपालिका व CEEW यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले हे दुसरे डिजिटल व्यासपीठ असून, यापूर्वी Air Quality Decision Support System (AQDSS) यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे. ही दोन्ही डिजिटल प्रणाली एकत्रितपणे ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातून होणारे हवा प्रदूषण कमी करण्यास, पर्यावरण संरक्षणास आणि शाश्वत शहरी विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे प्र.मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com