Top Post Ad

दि बा पाटील यांच्या विचारात. आगरी कोळी कराडी समाज एक होतोय

नवी मुंबई विमानतळास ओबीसी नेते दि बा पाटील यांचे नाव मिळावे.अशी प्रामाणिक इच्छा ओबीसी आगरी कोळी कराडी समाजात निर्माण झाली.त्यावर सातत्य पूर्ण आंदोलने सुरू झाली.देशात ही अत्यंत क्रांतिकारी घटना आहे. उच्चवर्णीय शोषक जातींचे नेतृत्व हेच तुमचे आदर्श आहेत.अशा थापा मारून आजपर्यंत हिंदू धर्माचा प्रवास सुरू होता. दि बा पाटील साहेब यांच्या नामकरण आदोलनांनी देशाची झोप उडविली आहे.नवी मुंबई परिसरात न्हावा शेवा या आमच्याच बंदराला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांचे नाव तर न्हावा शिवडी समुद्री सेतू साठी ब्राह्मण अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले गेले.मग आमच्या ओबीसी शूद्र आगरी कोळी कराडी नेतृत्वास दि बा पाटील यांना सन्मान का नाही.नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलन हे आता भाजपा सरकारची डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.

मुळात शूद्र अतिशूद्राणी हिंदू धर्मातील ब्राह्मण सांगतील, त्या देवांची पूजा करावी.याच्या पलीकडे गेल्यास कुणा महापुरुषांची पूजा करावी? तर टिळक गांधी नेहरू आहेत.परंतु या लोकांनी शूद्र ओबीसी लोकांसाठी काय केले? हा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी देव धर्म राजकीय सत्ता यांच्या माध्यमांतून इथल्या स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांचे शोषण केले आहे. याबाबतीत प्रबोधन साऱ्या देशात महात्मा जोतिबा फुले यांनी केले.    साऱ्या भारतातल्या मागासवर्गीयांना खरा राष्ट्रपिता मिळाला.यांना "महात्मा" ही पदवी मांडवी कोळीवाडा मुंबई येथे ज्या बंडखोर लोकांनी दिली त्यात आगरी कोळी भंडारी सागरपुत्र लोक होते.

शूद्र हा प्रतिष्ठावान असू शकतो.हे मनुस्मृती मानीत नव्हती.त्याने कायम गुलामितच जगावे .अशी उच्चवर्णीयांनी केलेली व्यवस्था देशात होती आज आहे.आजही महात्मा जोतिबा फुले यांना संविधान निर्मात्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी" गुरु" मानुन सर्वोच्च सन्मान देऊनही, आपल्या भारत सरकारने त्याचा यथोचित सन्मान केला नाही.त्यांच्या वरील चित्रपटास ब्राह्मण स्त्रिया पुण्यातून आजही विरोध करतात.ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.  मुळात शूद्र अतिशूद्र यांचे नेते गुलामीत जगणाऱ्या आपल्या मागास जातींच्या शिक्षण जमीन पाणी जंगल मानवी अधिकारांसाठी लढतात. तेव्हा हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे देशात कायम सत्तेत असणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींचे लोक त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान कशाला करतील.?हे ओबिसिनि समजून घेतले पाहिजे.

ओबीसींच्या विरोधी असलेल्या हिंदू धर्म सत्तेला आगरी कोळी कराडी लोकांनी ओळखावे यासाठी दि बा पाटील यांनी मोठा संघर्ष केला आहे.ही गोष्ट भाजप संघ परिवाराच्या आणि प्रमुख उच्चजातीय राजकीय पक्षाच्या लक्षात आली आहे.त्यामुळे धर्मचिकित्सक जोतिबा फुले,सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना देशातील उच्चवर्णीय मनुवादी मानसिकतेच्या लोकांचा विरोध आहे. बुद्ध चार्वाक फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणारे दि बा पाटील खासदार म्हणून साऱ्या देशात ओळखले जातात.ओबीसी आरक्षणाचे समर्थक,मंडल आयोगाच्या आंदोलन करण्यासाठी त्यांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर सारा भारत पिंजून काढला होता.या गोष्टी आगरी कोळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांना सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे नामकरण आदोलनात सरकार नाव द्यायला केवळ आश्वासने देत वेळ काढत आहे.यापाठीमागचे उच्चवर्णीय मनुवादी मानसशास्त्र ओबिसिनी समजून घेतले पाहिजे.

गुलामीत पिचलेल्या शोषित जाती संघटित करणे ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी समाजास स्वतःचे दूरदृष्टीचे नेतृत्व दिल्याचा इतिहास आहे.खऱ्या अर्थाने या ओबीसी जातींनी आताच्या बौद्ध बांधवांच्या बरोबरीने शिक्षण आरक्षण यात पुढे यायला हवे होते. दि बा पाटील आणि ॲड दत्ता पाटील या नेतृत्वाने आगरी कोळी कराडी समाजास संघटित करण्याचा प्रयत्न केला होता.आता दि बा पाटील यांच्या मरणोत्तर त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळास मिळावे अशी मागणी पुढे येतेय.यासाठी आगरी कोळी कराडी समजातील सर्व पक्षातील राजकीय सामाजिक नेते.सुशिक्षित तरुण तरुणी गृहिणी, शेतकरी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मागास वर्गीय समाजाने आपला उत्कर्ष कसा करावा ?यासाठी डॉ बाबासाहेब आबेडकर आणि त्यांचा बौद्ध समाज हाच खरा आदर्श आहे.हिंदुत्वाच्या कोणत्याही संघटनेत,राजकीय पक्षातील विचार ओबीसी लोकांच्या उपेक्षित शोषित जीवनास अनुकूल नाही.त्यामुळे ज्यांच्या मनात हिंदुत्वाला अनुकूल भावना असतील? तर त्यांनी लोकनेते दि बा पाटील यांचा जीवन संघर्ष समजून घ्यावा.

दि बा पाटील यांचा विचार हा समतेचा आहे.वैदिक हिंदू धर्म हा विषमतेचा समर्थक आहे.अगदी दि बा पाटील यांच्या नावाची मागणी भारतीय संविधानातील सामाजिक न्याय आणि समता समर्थक असली तरीही देशातील उच्चवर्णीय नेतृत्वास न पटणारी अशी आहे.त्यामुळे खूप मोठा संघर्ष ओबीसी लोकांपुढे वाढून ठेवला आहे. आशेची गोष्ट अशी की आगरी कोळी कराडी समाजातील तरुणांना आता दि बा पाटील यांच्या नावात आपल्या मानवी हक्कांची अस्मिता दिसू लागली ही कौतुकास्पद गोष्ट ठरली.शिक्षण आरक्षण व्यवसाय राजकारण उद्योग कला साहित्य संशोधन सरकारी नोकऱ्या प्रशासन यात उच्चवर्णीय जातीबरोबर बरोबरीचा संघर्ष करणे. म्हणजेच समतेचा संघर्ष आहे.देशातील समस्त ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांना हिंदू धर्माच्या शोषणातून मुक्त करण्याचा दि बा पाटील यांनी दिलेला आदर्श आगरी कोळी कराडी तरुणांनी स्वीकारावा.हेच खरे जीवन आहे. दि बा पाटील यांनी देव स्वर्ग आत्मा चमत्कार नाकारून आम्हास जो न्याय सिडको विरुद्धच्या लढ्यात  दिला. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

  • राजाराम पाटील.
  • उरण रायगड.
  • ८२८६o३१४६३.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com