Top Post Ad

Cocroach जनता पार्टीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट कारभाराविरोधात मुंबईत शांततापूर्ण आंदोलन

भारतातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था निर्माण व्हावी, या मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टी मुंबई, महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले.  शिक्षण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आंणि निष्पक्षता यांची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.   देशभरातील विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो युवकांमध्ये परीक्षा व्यवस्थेबाबत गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. विविध परीक्षा प्रक्रियांशी संबंधित कथित गैरप्रकारांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. कॉक्रोच जनता पार्टीचे हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने  मुंबई पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व कायदेशीर अटी व नियमांचे पालन करून करण्यात आले. सर्व आंदोलकांना शिस्त, संयम आणि कायद्याचा आदर राखण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाले होते. 

1) देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावां 2) राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा 3) विविध परीक्षा प्रक्रियांतील कथित पेपरफुटी किंवा गैरप्रकारांची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी.  ४) दोर्षीवर कठोर कायदेशीर कारवाई करून उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावे. ५) विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यांसाठी प्रभावी सुधारणा करण्यात याव्यात. ६) MPSC सह स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह प‌द्धतीने घेण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात.   ७) विद्यार्थ्यांना भ्रष्टाचारमुक्त, न्याय्य आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. या प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. 

तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे  सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला १६ दिवस पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दीर्घकाळ सुरु असलेल्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडत असल्याचे वृत समोर येत आहे. आम्ही संबंधित प्रशासनाला या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन संवादा‌द्वारे तोडगा काढण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.  आंदोलन कोअर कमिटीचे प्रणय अहिरे,  अमोल आसूळकर,  इंद्रजीत मोहिते, अमीर काझी, कुणाल कामीरकर, मयुर शिर्के, चिमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते मुंबईत नसल्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या निवासस्थानी आंदोलन कमिटी यांनी जाऊन निवेदन देण्यात आले. त्यावेळी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करण्याची विनंती करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि , येत्या तीन ते चार दिवसांत मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट आयोजित करतो असे सांगितले. आज जरी यश मिळाले असेल तरी जोपर्यंत या राज्याचे शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com