Top Post Ad

Negotiable Instruments Act मुंबईत विशेष लोकअदालतीत धनादेश अनादर प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय प्रमुख न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या नेतृत्वाखाली आज धनादेश अनादर (Negotiable Instruments Act, Section 138) प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या विशेष लोकअदालतीसाठी एकूण 13 पॅनेल कार्यरत करण्यात आले होते. लोकअदालतीत एकूण 5,700 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 693 प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन निपटारा करण्यात आला. विशेष म्हणजे 10 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या 44 प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला. 

या लोकअदालतीत तडजोडीद्वारे एकूण ₹217,38,04,884 (रुपये दोनशे सतरा कोटी अडतीस लाख चार हजार आठशे चौर्‍याऐंशी) इतक्या रकमेचा सेटलमेंट करण्यात आला. लोकअदालतीच्या माध्यमातून पक्षकारांचा वेळ, खर्च व न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होण्यास मोठी मदत झाली. तसेच परस्पर सामंजस्याने वाद मिटविण्याच्या लोकअदालतीच्या संकल्पनेला प्रभावी बळ मिळाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी या विशेष लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील, बँकांचे प्रतिनिधी, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com