Top Post Ad

SIRnews मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कामकाजात गती आणण्याचे निर्देश

 भारत निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) कार्यक्रम सुरू आहे. तथापि, या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संपूर्ण कामकाजात गती आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे यांनी केले आहे.


मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) - २०२६ च्या अनुषंगाने, २६ - मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आज (दिनांक १८ जुलै २०२६) मालाड येथील लिबर्टी गार्डन येथील मुंबई पब्लिक शाळेत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी यावेळी उपस्थिती होते. 

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कामकाज प्रभावित झाले होते. आगामी काही दिवसात देखील पावसाची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता आता गृहभेट आणि डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामकाजाला गती देण्याची गरज आहे. त्यामुळे, सर्वांनी विहित कालावधीत सदर कामकाज पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. 

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कामकाज कालबद्ध पद्धतीने विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी गणना अर्ज वितरण आणि डिजिटायझेशन या दोन्ही बाबी समांतर पद्धतीने वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामकाजासाठी माननीय भारत निवडणूक आयोगानी मुदतवाढ दिली आहे. तथापि, आपल्या मूळ विभागातील कामकाज, आगामी काळातील संभाव्य पाऊस परिस्थिती आदी सर्व बाबींचा विचार करावा. आवश्यक त्या वेळी अतिरिक्त आणि सुटीच्या दिवशी कामकाज करून गृहभेट आणि डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून, ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे आणि विहित कालावधीत पूर्ण होईल, असेही बांगर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com