Top Post Ad

ThaneNews 'सोनम वांगचूक' यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणेकरांचा 20 जुलै रोजी सत्याग्रह

"केंद्रशासित 'लडाख'ला पूर्ण राज्याचा दर्जा व तेथील अत्यंत संवेदनशील असलेल्या निसर्ग-पर्यावरणाचं संरक्षण करण्याकामी राज्यघटनेच्या ६ व्या परिशिष्ट्रात लडाखचा समावेश करण्यासाठी; तसेच, लडाखला खासदारीच्या जागेची व स्क्तंत्र 'UPSC'ची मागणी  'NEET-UG MEE'च्या पेपरफुटीच्या संदर्भात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यासाठी 'CJP, SFI, AISA, AISF, NSUI' यांच्या जंतरमंतर मैदानावरील (दिल्ली) आंदोलनाला सक्रिय पाठींबा म्हणून ठाण्यात विविध संघटनांच्या वतीने सोमवार, 20 जुलै रोजी, सकाळी 11 वाजता शासकीय-विश्रामगृह /जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, कोर्ट नाका, येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.  

'थ्री इडियट्स' सिनेमामागील प्रेरणास्थान, पर्यावरणवादी तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ-संशोधक; तसेच, 'रमन मॅगसेसे' आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'सोनम वांगचूक' २८ जूनपासून आमरण उपोषणास बसलेत, त्यांच्या, "चलो संसद" आंदोलनास  धर्मराज्य पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटर्स असोशिएशन,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), कायद्याने वागा लोकचळवळ, अन्न-अधिकार अभियान, भारत जोडो अभियान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), श्रमिक जनता संघ,  बहुजन विकास संघ   आयटक, गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती व अन्य समविचारी संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.  दिल्ली येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला  सक्रिय पाठींबा म्हणून ठाण्यात  निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. तरी सर्व ठाणेकरांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com