नागपूर :
मंगलप्रभात लोढा मंत्री झाल्यापासून वारंवार पत्रे देऊन, वेगवेगळ्या मंत्र्यांच्या शिफारशी देऊन, वारंवार बोगस ट्रेनिंग वर बातम्या येऊन सुद्धा कौशल्य विकास मंत्र्यांना सर्वसामान्य ट्रेनिंग संस्थांशी बोलायला वेळ नाही असा आरोप महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाचे राज्याध्यक्ष लक्ष्मण झणझणे यांनी केला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाच्या ट्रेनिंग देणाऱ्या ' सर्वसामान्य संस्थांना वर्षाकाठी चार-पाच बॅचेस मिळतात आणि कोणताही पुरावा नसताना फक्त अधिकाऱ्यांच्या वर विश्वास ठेवून सदर संस्थांना बोगस ठरवण्याचे काम सदर मंत्री महोदय करत आहेत. हा ट्रेनिंग संस्थांवर अन्याय असल्याचे स्पष्ट मत झणझणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
उलटपक्षी ज्या एम ओ यु पार्टनर / मोठमोठ्या ट्रेनिंग पार्टनर वर सायबर क्राईम मध्ये, अँटी करप्शन मध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांना अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, नवीन नियमानुसार टीपी टीसी करून सुद्धा टर्नओव्हर ची अट्ट ठेवून मोठमोठ्या लोकांनाच कामे दिली गेली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ट्रेनिंग संस्थांना कामे नसल्याने टर्नओव्हर भरत नाही, कामे पण मिळत नाहीत. अशी मोठमोठी कामे घेणाऱ्या ट्रेनिंग पार्टनर कडे स्वतःची अशी ट्रेनिंग सेंटर नसतात. ही माणसे वारंवार खालील दुसऱ्या सेंटर कडून कमी पैशात कामे करून घेणे किंवा पैसे बुडवणे त्यामुळे खालील सर्वसामान्य ट्रेनिंग सेंटर सुद्धा त्यांचे कडे कामे करत नाहीत. अशावेळी मोठमोठे ट्रेनिंग पार्टनर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतील व सेक्टर स्किल कौन्सिल मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन हजार, चार हजार, दहा हजार, अशी मोठमोठी प्रशिक्षणार्थीची टारगेट घेऊन, बोगस सेंटर, बोगस विद्यार्थी, बोगस हाजरी दाखवून शासनाचे कोट्यावधी रुपये फुकट घेत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग पासून वंचित, ट्रेनिंग सेंटर आणि त्यांचा कर्मचारी कामधंद्यापासून वंचित असा चारी बाजू ट्रेनिंगचा बोजवारा उडालेला असल्याचे झणझणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघ वारंवार मंत्री महोदयांना किंवा मंत्रालयातील सचिव लेवलवरील लोकांना सोसायटी मधील गेले तीन-चार वर्ष महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये भ्रष्ट अधिकारी काय करतात हे सांगत असताना देखील ऐकले नाही आणि आता नुकतेच हे सर्व उघड झालेले आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केंद्र व राज्य शासनाने भ्रष्टाचार करता यावा म्हणून ज्या जाचक अटी टाकल्या आहेत त्या काढण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर येऊन किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघा बरोबर चर्चा करून, त्या काढल्या गेल्या पाहिजेत. दरवर्षी टीसी रजिस्ट्रेशन, दर तीन वर्षांनी टीपी रजिस्ट्रेशन, दर दोन वर्षांनी टीओटी रजिस्ट्रेशन, तीन-चार महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये सर्वसामान्य कर्मचारी तयार करताना सुद्धा एसीची सक्ती, स्टार रेटिंग मध्ये गरज नसताना पंधराशे चौरस फुटांपेक्षा जास्त जागा त्यामुळे मेट्रो सिटीतील 90% सेंटर बंद, बस स्टॅन्ड रेल्वे स्टेशन जवळील सेंटरला प्राधान्य त्यामुळे मेट्रो सिटीतील मुले ट्रेनिंग पासून गेले तीन वर्ष वंचित राहिली आहेत.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सर्वसामान्य ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांची ज्या वर्षाकटी प्रामाणिकपणे तीन-चार बॅचेस घेत आहेत, त्यांना बोगस ठरवून, त्यांची ट्रेनिंगची व प्लेसमेंट ची बिले रखडवत आहेत त्यामुळे सदर संस्था कर्जबाजारी झाल्या आहेत. शासकीय आय.टी.आर सारख्या संस्थांना मोफत ट्रेनिंग चे काम दिले जाते. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना शासकीय पगार असल्याने ते या ज्यादा ट्रेनिंग च्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग पासून वंचित राहतात. त्यामुळे दिल्लीतून व राज्यातून कोणतीही योजना न राबवता पूर्वीप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास अधिकाऱ्यामार्फत सदर संस्थेची ग्राउंड लेव्हलवर तपासणी होऊन, त्याची क्षमता पाहून, त्यांना ट्रेनिंग चे टार्गेट दिले तरच बोगस कामे बंद होतील.
दर्जेदार ट्रेनिंग होण्यासाठी कौशल्य विकास सर्टिफिकेट शासकीय निम शासकीय नोकऱ्यांमध्ये, उद्योगांमध्ये लागू करण्यात यावे. त्यामुळे शिकणारा व शिकवणारा दोन्हीही सिरीयस होतील, दहा-बारा लाख रुपये घालून ट्रेनिंग सेंटर सुरू केल्यानंतर दरवर्षी कुवतीप्रमाणे कामाची हमी मिळालीच पाहिजे, सर्वसामान्य कर्मचारी तयार करायचे असल्याने स्टार रेटिंग सिस्टीम बंद झाली पाहिजे, टर्नओव्हरचे अट रद्द करून नवीन व सर्वसामान्य ट्रेनिंग सेंटरला काम मिळाले पाहिजे, अस्तित्वात असलेल्या सर्वसामान्य ट्रेनिंग सेंटरला पेंडिंग पेमेंट ताबडतोब काढून ऊर्जीत अवस्था प्राप्त करून दिली पाहिजे. केंद्रात व राज्यात, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघातील, ग्राउंड लेवलवर काम करणारे प्रतिनिधी घेऊन कोणतीही योजना तयार केली तर कौशल्य विकास योजनास भरभराटी प्राप्त होईल... व पाहिजे असे कुशल कर्मचारी तयार होतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेले तीन चार वर्षात ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे पुर्वीच्या व आत्ताच्या मोठमोठ्या एमओयु पार्टनर ची, टीपीची, व कंपन्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.
0 टिप्पण्या