प्रदीर्घ लांबीचा समृद्धी महामार्ग पाच वर्षात पुर्ण होतो. त्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातात. मात्र कोकणातील अत्यंत उपयुक्त असा मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील 18 वर्षापासून अद्यापही पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. कोकणातील लोकप्रतिनिधी केवळ आपआपला स्वार्थ साधण्याकरिताच संसदेत, विधानभवनात जातात काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. रायगड जिल्ह्यात निवडून येणारे सर्वच आमदार व खासदार सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारमधील प्रतिनिधित्व करीत असताना देखील कोकणवासियांना वाहतूक कोंडी व खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने आता हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले.
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे असल्याने वेळेत आपल्या गावी पोहोचताना वेग मर्यादेचं पालन करावं लागलं. वाहतूक कोंडीमुळे तासनतास एकाच ठिकाणी गाडी अडकून राहिल्यानं हा प्रवास मोठी डोकेदुखी ठरला. 2010 पासून सुरू असलेले काम अद्याप अपूर्ण असल्याने मागील 15 वर्षांत 4,531 प्रवाशांचा मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू अपघाती नसून “सरकार आणि ठेकेदारांनी केलेले खून” असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. त्यामुळे संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि तरुण वारसांना पीडब्ल्यूडीसारख्या शासकीय खात्यात नोकरी द्यावी. अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबत सरकारला जाग करण्यासाठीच यंदाचा गणेशोत्सव या महामार्गावर ‘मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी यावर्षीचा गणपती उत्सव याच महामार्गावर मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा म्हणून साजरा होणार आहे. त्या आंदोलनाची रूपरेषा खालील प्रमाणे असेल.
* रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर "पनवेल पळस्पे" येथे सकाळी ११:०० वाजता पाटपूजन सोहळा करण्यात येईल.
* रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता "पेन" येथे पाद्यपूजन सोहळा पार पडेल.
* बुधवार दिनांक २७ ऑगस्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११:३० वाजता लांजा येथे प्रत्यक्ष या आंदोलनातील गणपती उत्सवाला सुरुवात होईल.
* २८ ऑगस्ट २०२५ रोजी ठिकाण पाली रत्नागिरी महाआरती वेळ - दुपारी १२:०० वाजता
* २९ ऑगस्ट २०२५ रोजी ठिकाण संगमेश्वर डेपोमहाआरती वेळ दुपारी १२:०० वाजता
* ३० ऑगस्ट २०१५ रोजी ठिकाण चिपळूण बहादूर शेख नाका महाआरती वेळ दुपारी १२:०० वाजता
* ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ठिकाण-नागोठणे वेळ-दुपारी-१२:०० वाजता
0 टिप्पण्या