सन 1965 मध्ये केंब्रिज विद्यापीठात राजीव गांधींशी झालेली भेट, त्यानंतरचे प्रेम, प्रेमाचे क्षण, त्या क्षणाच्या गोड आठवणी ते 2014 पासून देशात सुरू झालेला मोदी सत्तेचा कार्यकाळ आणि त्या काळातील आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंतचे देशातील द्वेष, मत्सर व नफरतीचे राजकारण, वातावरण, लोकशाही व संविधानात्मक व्यवस्थेला निर्माण झालेला धोका, याबद्दलच्या सर्व घटनांना श्रीमती सोनिया गांधींनी आपल्या बिलॉगगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह (belonging: journey of love) या आत्मकथेत शब्दबद्ध केले आहे. 1965 ते 2026 हा कालखंड थोडा थोडका नाहीतर सहा दशकांचा आहे. या कालखंडात अनेक प्रसंगांना तोंड देत सोनिया गांधींनी आपले कुटुंब, काँग्रेस पक्ष आणि देशाची एकता, अखंडता कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संजय गांधींचा विमान अपघातात झालेला मृत्यू, त्यानंतर मेनका गांधीना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस, त्यातून परिवारात निर्माण झालेला ताणतणाव, मेनकाचा गांधी परिवारा बरोबरचा द्रोह आणि संघाशी जवळीक, आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा झालेला पराभव, 3 वर्षात पुन्हा मिळालेली सत्ता, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधी यांचा सत्ताकाळ आणि त्यांची ही झालेली हत्या, गांधी परिवारापासून पोरकी झालेली काँग्रेस, तिची वाताहात याबद्दलचा सर्व लेखाजोखा तटस्थपणे आपल्या आत्मकथेत मांडण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला आहे.
इटली, केंब्रिज ते भारत या आपल्या जीवन प्रवासाविषयी स्वतः सोनिया गांधींनी स्पष्टपणे कथन केल्याने त्यांच्या विरोधात अफवा पसरविणारे संघी, भाजपई व्हॉट्स अॅप ग्रुप, अंधभक्त हे पुस्तक आल्यानंतर बेकार झाले आहेत. राजीव गांधींच्या हत्येनंतर 1991 मध्ये प्रधानमंत्री बनण्याची संधी असताना त्या पदाचा त्याग करणे सोपी गोष्ट नव्हती, पण सोनिया गांधींनी तो केला. पक्षांतर्गत शरद पवार, पी. ए. संगमा यांचा विरोध असताना ही युपीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्यावर प्रधानमंत्री बनण्याची संधी 2004 मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे होती. पण पुन्हा या पदाचा त्याग करीत त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना प्रधानमंत्री केले. आपल्या दोन टर्म म्हणजे दहा वर्षांच्या सत्तेच्या काळात देशाला अधिक विकसित व समुद्ध करण्याचे काम करून सोनिया गांधींच्या विश्वासास डॉ. मनमोहन सिंग पात्र ठरले. तर बहुमत असताना दोन वेळा प्रधानमंत्रीपदाचा त्याग करून देशसेवा करण्याचा आदर्श देशातील जनतेसमोर ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य सोनिया गांधींनी केले आहे. यामुळे संघ, भाजप आणि त्यांच्या अंधभक्तांनी किती ही घाणेरडी टीका केली तरी सोनिया गांधींचे श्रेष्ठत्व कमी होणार नाही. इतिहास आणि इतिहासाची पानं सर्वांना आपापली औकात दाखवितात. वाजपेयी 3 वेळा व मोदी ही 3 वेळा प्रधानमंत्री झाले, पण सावरकरांना भारतरत्न देवू शकले नाहीत. याचे कारण ही हाच इतिहास आहे. संघ, भाजप सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणत असले तरी इतिहास त्यांना स्वातंत्र्यवीर मानत नाही. इतिहास माफीवीरच मानतो व माफीवीराला कुणी ही प्रधानमंत्री असला तरी भारतरत्न देता येत नाही.मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया, प्रियांका व राहुल गांधी या पाच पिढ्यांनी या देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याचे व्रत घेतले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्ष तुरुंगवास भोगला आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे. दीर, सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख सोनिया गांधींनी पचविले आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्या एकट्या पडल्या होत्या. या सर्व गोष्टींना ही त्यांनी आपल्या या आत्मकथेत शब्दबद्ध केले आहे. जगाला सत्तेचे वैभव दिसत असले तरी गांधी परिवार काटेरी कुंपणात जगत होता अन देशाच्या हितासाठी आपले योगदान देत होता, हे साऱ्या जगाला माहित आहेच. पण या आत्मकथेच्या माध्यमातून ते आणखी प्रकर्षाने पुढे आले आहे.
पंडित नेहरू यांनी स्वतः अनेक पुस्तके लिहिली, त्यांच्यावर ही अनेक पुस्तके लिहिली गेली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर ही अनेक पुस्तके लिहिली गेलीत, पण यापैकी कुणीच आत्मचरित्र लिहिलेले नाही. Belonging: journey of love ही आत्मकथा लिहून नेहरू, गांधी परिवारातील आत्मकथा लिहिणाऱ्या सोनिया गांधी या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती. पुस्तक प्रकाशित होताच लाखो प्रति विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकाने विक्रीचा आणि चर्चेचा विक्रम केला आहे. देशात केवळ अन केवळ सोनिया गांधींच्या या पुस्तकाची व त्यातील शब्दाची चर्चा आहे. अनेकांची पोलखोल झाली आहे. मोदींच्या सत्ताकाळात द्वेष, मत्सर व नफरतीचे राजकारण व वातावरण देशाच्या एकता व अखंडतेला खंड खंड करू शकते, हा इशारा देण्याचे काम अनेक घटना, सरकारची धोरणे व उदाहरणाच्या माध्यमातून सोनिया गांधींनी दिला आहे.
आत्मकथा: राजीव सोनिया गांधींच्या प्रेमाचा नाहीतर देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचा दस्तावेज......! Belonging: journey of love असे पुस्तकाचे नाव असले तरी केवळ सोनिया व राजीव गांधी यांच्या प्रेमाचा दस्तावेज हे पुस्तक नाही, तर 1965 ते 2026 पर्यंतच्या देशातील सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी साऱ्या गोष्टींचा केलेला ऊहापोह यात आहे. देशाचा सहा दशकातील प्रवास आहे. मेनका गांधी यांना संघाने गांधी परिवाराच्या विरोधात उभे करून एक परिवार तोडला, याबाबतची सडेतोड मांडणी या पुस्तकात करून संघाचा आणखी एक क्रूर व घिनौना चेहरा जगासमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य हे पुस्तक करीत आहे. या पुस्तकाने संघ, भाजपची आणि ते ज्या विचारधारेचे समर्थक आहेत, त्या साऱ्यांनी पोलखोल हे पुस्तक करते. त्या शिवाय मूळच्या विदेशी असलेल्या सोनिया गांधी यांची ही आत्मकथा अधिक देशी व भारतीय झाली आहे. त्यामुळे या पुस्तकाला विरोध कसा करायचा या गोंधळात संघोटे पडले आहेत.
गेल्या सहा दशकातील सर्वच राजकीय घडामोडींवर अगदी तटस्थपणे कटाक्ष करण्याचे काम हे पुस्तक करीत आहे. बाबरी मशीद शहीद झाल्यानंतर मी रडले, खूप वेदना झाल्या, असे सोनिया गांधी लिहितात. यावर संघ पुन्हा त्यांच्यावर तुटून पडला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, या देशाच्या संविधान, लोकशाही व न्याय व्यवस्थेवर ज्यांचा विश्वास व निष्ठा आहेत, त्या सर्वांनाच वेदना झाल्या होत्या. कारण हा हल्ला, हमला त्या विरान मशिदींवरील नव्हता तर संविधान व लोकशाहीवर होता. रामनाथ यात्रा काढून बाबरी मशीद शहीद करण्याचे वातावरण तयार करणारे लालकृष्ण अडवाणी यांना ही या घटनेने वेदना झाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांना ही झाल्या होत्या. याबाबत त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केली आहेत.
न्यायालयात ही तशी कबुली दिलेली आहे. इतकेच की, ते संवेदनशील नसल्याने रडले नाहीत. अन आपली स्वतःची जी विचारधारा आहे, तिच्याबाबतीत ते प्रमाणिक नाहीत. ढोंगी आहेत. 2011 मधील लोकपाल विधेयकाची मागणी, अण्णा हजारे आंदोलन हे एका पॉलिटिकल स्कॅमचा भाग होता. काँग्रेसच्या भांडवलदार विरोधी धोरणांमुळे नाराज असलेले उद्योगपती आणि प्रशासनातील संघाच्या स्लिपर सेलमधील वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून संघ, भाजपने अण्णा हजारे, केजरीवाल आंदोलन घडवून आणले. लोकपाल विधेयक अथवा भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दाच नव्हता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारला बदनाम करण्याचा हा देशविरोधी कट होता. याबाबतची चर्चा गेल्या दीड दशकात अनेक वेळा झालेली आहे. पण इतक्या स्पष्टपणे यावर कुणीच भाष्य आजपर्यंत केलेले नाही. सोनिया गांधी यांनी या पुस्तकात केलेले आहे. त्यामुळे अण्णा हजारे आंदोलन, केजरीवाल, त्यांची पूर्ण टीम आणि संघ, भाजपचे संबंध या संदर्भातील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
400 चे पाशवी बहुमत घेवून मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर संविधान बदलतील ही भीती 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना संविधानावर निष्ठा असलेल्या पक्षांना वाटत होती. त्यामुळे संविधानवादी पक्षांनी एकत्र येवून इंडिया आघाडीची स्थापना करून मोदीच्या विरोधात एक भक्कम पर्याय उभा केल्याचे प्रकरण या पुस्तकात आहे. इंडिया आघाडीच्या स्थापनेत सुरुवातील मुख्य भूमिकेत असलेल्या नितीश कुमार यांच्यावर संघ, भाजप व त्यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रचंड दबाव असल्याने ऐनवेळी त्यांनी इंडिया आघाडी सोडली व ते एनडीएत सामिल झाले. याबाबत ही सविस्तरपणे वस्तुनिष्ठ भूमिका सोनियाजीने पुस्तकात मांडली आहे. गेल्या सहा दशकात देशात नेमके काय झाले आहे, काय काय घडले आहे, याचा दस्तावेज या पुस्तकात आपल्या आत्मकथेशी जोडत मांडण्यात सोनिया गांधी यशस्वी झाल्या आहेत.
एक सुहागन म्हणून या देशात आले, या देशाची सून झाले, या देशातच मुलांना जन्म देवून आई झाले. दरम्यानच्या काळात या देशाची नागरिक झाले. भारतीय झाले. आपल्या भारतीय असण्याचा अभिमान व गर्व त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल व प्रियांका यांना घेवून त्या कुठल्याही देशात जाऊन राहू शकल्या असत्या. त्यांच्यासाठी ते अशक्य नव्हते. पण त्यांनी होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करीत काँग्रेसचे नेतृत्व केले. आज राहुल गांधी व प्रियांका गांधी देशाचे नेतृत्व खंबीरपणे करीत आहेत. या देशाचे संविधान आणि लोकशाही व्यवस्था वाचविण्याचा लढा सोनिया गांधी आपल्या दोन मुलांना घेवून लढत आहेत. हा नेहरू व गांधी परिवाराचा वारसा आहे. तोच त्या व त्यांची मुले चालवित आहेत. SIR, वोट चोरीच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभर ज्ञानेशकुमारचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारची झोप उडाली असतानाच मोदीच्या 12 वर्षांच्या सत्तेची पोलखोल करणारे सोनिया गांधी यांच्या आत्मकथेचे पुस्तक प्रकाशित झाल्याने ही पोलखोल आणखीच झाली आहे.
- राहुल गायकवाड,
- महासचिव, समाजवादी पार्टी मुंबई/महाराष्ट्र प्रदेश

0 टिप्पण्या