Top Post Ad

प्रलंबित सुधारित किमान वेतनाच्या थकित फरकासाठी कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन

      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे वाहनचालक आणि सफाई कर्मचारी यांची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मार्च 2015 पासून प्रलंबित आहे. श्रमिक जनता संघ युनियनच्या प्रयत्नांमुळे दिनांक 04/08/2021 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तात्कालिन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी साहेब यांनी लेखी आदेशाद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने सुधारित किमान वेतन लागू केले आहे व त्यानंतरचे आयुक्त  भाऊसाहेब दांडगे यांनीही दिनांक 11/05/2023 रोजी लेखी पत्राद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने सुधारित किमान वेतन लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानंतर तात्कालिक आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी देखील युनियनच्या शिष्टमंडळासमोर संबंधित अधिकाऱ्यांना थकीत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते.परंतू कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने अद्याप पर्यंत संबंधित कामगारांना सुधारित किमान वेतनाची थकित रक्कम अदा करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने येत्या मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

  सदर बाबत दिनांक 2 जून रोजी आमच्या संघटनेच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांनी सद्याचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली असता, येत्या 8 दिवसांत सदर प्रकरणावर निर्णय घेऊन कामगारांना किमान वेतनाच्या थकित रक्कम अदा करण्यात येईल, असे आश्वासन आपण दिले होते. मात्र कामगारांच्या हक्काचे वेतन महापालिका प्रशासन गेले दहा वर्षे वापरत किमान वेतन अधिनियम १९४८ सर्रासपणे पायदळी तुडवीत आहे. वयोमानानुसार कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना नियमानुसार उपदानाची (Gratuity) रक्कम अदा करणेबाबत कर्मचारी दोन वर्षे वाट पाहत आहेत. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसल्याने अशा कामगारांची बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रशासनाला लक्षात आणून दिल्यानंतर देखील दुर्लक्ष होत असल्याने कामगारांनी आता आंदोलनाची पावले उचलावी लागत असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि सचिव सुनील कंद यांनी सांगितले. दिनांक 25 ऑगस्ट 2025 पर्यंत सुधारित किमान वेतनाच्या फरकाची थकित रकमेबाबत ठोस निर्णय  न झाल्यासकल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईच्या निषेध करण्यासाठी नाइलाजाने दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.00 वाजेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर सर्व कामगारांसमवेत निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सचिव सुनील कंद यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com