दंगल होईल, अनेकांचे बळी जातील अश्या गोष्टी पोलिसांच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या. त्यालाही शेतकऱ्यांनी दाद दिली नाही. कारण ती सुद्धा सरकारची चाल होती हे शेतकरी ओळखून होते. प्रत्येक आंदोलकाच्या जीविताचे रक्षण करणे ही राज्याची ( सरकारची) संविधानिक जबाबदारी असते. हे कळण्या इतपत शेतकरी शहाणे होते.सरकारची मानसिकता बघून चळवळीच्या अनेक नेत्यांनी माघार घेण्याची विनंती केली. शेतकऱ्यांनी त्या नेत्यांना घरी पाठवले पण माघार घेतली नाही. शेवटी केंद्र सरकार ला नमावे लागले. काळे कायदे माघारी घेण्याची अधिकृत घोषणा नरेंद्र मोदी सरकार ने केली तेंव्हाच शेतकऱ्यांनी आपापली जागा सोडली.
मराठ्यांना देखील आता भरपूर अनुभव आला आहे. सरकार वेगवेगळे हातखंडे वापरून आपल्याला कन्विन्स करते. भोळा भाबडा समाज मोठ्या आशेने माघारी जातो. नंतर कळते की आपल्या हाती आश्वासनाचा कागद सोडून काहीच मिळाले नाही. त्यामुळे मराठा समाजातील कितीही मोठ्या माणसाने ओबीसी आरक्षणचा कायदा हाती न घेता माघारी फिरण्याची विनंती केली, तरी यावेळी समाज ऐकणार नाही. अधिसूचनेच्या मसुद्यावर माघारी नाही तर प्रॉपर विधानसभेत केलेला कायदाच हाती घ्यायचा असा दृढनिश्चय समाजाने केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रमाणे आमच्याही मागणीत स्पष्टता आहे. ओबीसी च्या यादीत मराठा समाजाच्या समावेशाची मागणी सोडून इतर कोणत्याही मागणीला आम्ही किंमत देणार नाही. इतर कोणतीही मागणी मंजूर केली तरी माघार घेणार नाही. अख्खा महाराष्ट्र जबाबदारी वाटून घेईल. यावेळी लढाई आरपारची असेल. काही महिने तरी आझाद मैदान मराठ्यांच्या ताब्यात राहील याची नोंद सरकार घ्यावी.
- adv योगेश केदार
- 9823620666

0 टिप्पण्या