मुंबई कलिना विद्यापीठाच्या परिसरातील मुलांच्या वसतिगृहाची अपुरी व्यवस्था लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गाव खेड्यातून विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणार्या अधिकाधिक विद्यार्थ्यांची सोय होवू शकेल. तसेच संस्कृत विभागाच्या माध्यमातून पाली विभाग हळूहळू संपवण्याचे कारस्थान होत आहे. पाली विभाग २००७ पासून स्वतंत्र आणि जोमदारपणे काम करत असूनही अद्याप UNAIDED आहे. AIDED साठी साधा प्रस्तावसुद्धा अजूनपर्यंत शासनाकडे पाठविला गेलेला नाही. AIDED झाल्यास प्राध्यापकांच्या भरत्या होतील. अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचा लाभ घेता येईल. देश विदेशांतील वेगवेगळ्या विद्यापीठांशी शैक्षणिक करार करता येतील. इमारत उभी करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. यासाठी पाली विभाग हा AIDED करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे ताबडतोब पाठवावा. या आणि इतर मागण्यांकरिता भन्ते विमांसा हे मागील आठ दिवसांपासून मुंबई विद्यापीठ, कलिना परिसरात आंदोलन करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना भन्तेजी म्हणाले, बौद्ध भिक्षुस सातत्याने त्रास, छळ, शिवीगाळ करत असल्याचा निषेध म्हणून तसेच कलिना परिसरातील मुलांच्या वसतिगृहाची अपुरी व्यवस्था (फक्त ८० जागा) लक्षात घेता आणि मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राचा (CEBS) विद्यापीठाशी अण्णाभाऊ साठे परिसराच्या वापराविषयीचा करार हा २०१६ सालीच संपुष्टात आला असल्याने त्यांचा अनधिकृत कब्जा ताबडतोब उठवून त्यांना विद्यापीठाने जी वेगळी स्वतंत्र जागा दिली आहे- जिथे इमारती बांधून ते वापरत आहेत तिथे त्यांचे पूर्ण स्थलांतर करण्यात यावे हा आग्रह करत आहोत. यामुळे विद्यापीठात शिकायला येवू पाहणाऱ्या परंतु वसतीगृहाच्या सामावून घेण्याच्या असक्षमतेमुळे गाव खेड्यातून विद्यापीठात येवू न शकणाऱ्या आपल्या ३०० विद्यार्थ्यांची सोय होवू शकेल.१९१२-१३ साली धर्मानंद कोसंबी यांनी स्थापन केलेला पाली विभाग हळूहळू संस्कृत विभागाने संपवून टाकला आणि त्यानंतर पुन्हा संस्कृत विभागात २००५ साली विभागाचे पुनरुज्जीवन झाले, २००७ पासून स्वतंत्र आणि जोमदारपणे काम करत असूनही अद्याप UNAIDED आहे. AIDED साठी साधा प्रस्तावसुद्धा अजूनपर्यंत शासनाकडे पाठविला गेलेला नाही. विभाग AIDED नसल्याने विभागाचे अस्तित्व हे कच्च्या स्वरूपाचे आणि दुर्बल असते. संपूर्ण विभाग हा विद्यापीठाच्या खर्चातून चालतो शासनाच्या नाही. AIDED झाल्यास तो पक्का आणि मजबूत बनतो, प्राध्यापकांच्या भरत्या होतील. अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचा लाभ घेता येईल. देश विदेशांतील वेगवेगळ्या विद्यापीठांशी शैक्षणिक करार करता येतील. इमारत उभी करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. यासाठी पाली विभाग हा AIDED करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे ताबडतोब पाठवणे गरजेचे आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी VC सरांच्या सोबत झालेल्या बैठकीत VC सरांनी पाली विभागास सिनेटची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र जमीन देवू हे आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात काही दिवसांनंतर शब्द फिरवून पाली विभागास नवीन होवू घातलेल्या "अवेस्ता पहेलवी" या इराणी भाषांचा अभ्यास करणाऱ्या विभागात नेवून ठेवणार असल्याचे जाहीर केले.
हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे, समस्त बौद्ध समाजाचा विश्वासघात करणाऱ्या या कृत्याचा आपण निषेध करत आहोत. संस्कृत विभागास स्वतंत्र जागा आहे त्यावर त्यांची स्वतंत्र इमारत उभी आहे. आता आता जन्मास आलेल्या 'प्रा. बाळ आपटे', 'अवेस्ता पहेलवी' या विभागांना जागा दिली जाते आणि पाली विभागास मात्र संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेव्हा विद्यानगरी परिसरात स्वतंत्र जमीन द्यावी 'सेंटर आव्ह एक्सलंस इन हेरीटेज लँग्वेजेस अँड मल्टीकल्चरल स्टडीज या अवेस्ता पहेलवी इराणी भाषांच्या अभ्यासासाठी तयार होत असलेल्या केंद्रात अभिजात दर्जा मिळालेल्या पाली भाषेचा जो समावेश VC सरांनी केला आहे तो सांस्कृतिक दमनाचे द्योतक आहे. पाली विभागास इतर विभागाचा आणि भाषेचा गुलाम बनवल्या जात मुंबई विद्यापीठात संस्कृतच्या जोखडातून मुक्त झालेल्या पाली भाषेचे स्वतंत्र असि टिकविण्यासाठी, पाली विभागाला अवेस्ता पहेलवीचा गुलाम करण्याच्या षडयंत्रास परतून लावण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे.
हीच वेळ आहे शांततेने प्रतिकार करण्याची.. सांस्कृतिक दमनाच्या विरुद्ध मौनाचा आवाज उठवण्याची... ध्यानपूर्वक हालचाल करण्याची... आपला हक्क घेण्याची. यानंतर वेळ गेलेली असेल. सरकार विद्यापीठांना उद्योगपतींच्या/भांडवलदारांच्या खिश्यात टाकण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत इतक्यात कधीही पोचू शकेल. उठा। त्वरा करा ! उद्या वेळ आणि काळ निघून गेला असेल. पुढील पिढ्या आपल्याला कधीच क्षमा करणार नाहीत. अस्मिता, आषा, धम्म यासाठी सर्व धम्म बांधवांनी २० ऑगस्टला विद्यानगरी परिसरातील मुख्य गेटजवळील चौकात दुपारी १ वाजता एकत्र येवून "पाली भाषा आणि विभाग मुक्ती आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. आंदोलनात कोणत्याही घोषणा नसतील, नारेबाजी नसेल, आवाज नसेल. हे आंदोलन शांततेचे आणि ध्यानाचे असेल. मौनाला आणि ध्यानाला आपण आंदोलनाचे साधन बनवायचे आहे. या मार्गानेच आम्ही आमच्या मागण्या मान्य करू असा विश्वास भन्ते विमांसा यांनी व्यक्त केला आहे. अधिक माहिती करिता भन्ते विमांसा ७५०६६९२२६० पीएच.डी (प्रबंध) अण्णाभाऊ साठे मुलांचे वसतिगृह, कलिना विद्यापीठ मुंबई येथे संपर्क साधून या आंदोलनाला गती द्यावी असे आवाहनही भन्तेजींनी केले आहे.

0 टिप्पण्या