नवी मुंबई तुर्भे येथे आज वाशी-डीबीएम व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उत्साहपूर्ण उद्घाटन झाले. धर्मा भारती मिशन (डीबीएम) इंडियाचे हे १० वे केंद्र असून, गेल्या १८ वर्षांपासून ही संस्था शिक्षण, रोजगार आणि समुदाय सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. तसेच वाशी परिवार फाउंडेशन सोबतीने हे त्यांचे दूसरे केंद्र आहे. या केंद्रात पॅरा नर्सिंग (GDA) आणि प्रि प्रायमरी टीचर्स trening (ECCED) अभ्यासक्रम सुरू झाले असून, तरुणांना रुग्णालये आणि शाळांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे श्री. तुषार गांधी यांचे फुलांनी स्वागत करून दीपप्रज्वलन आणि फीत कापून केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी लायन्स क्लब ऑफ घाटकोपरचे अध्यक्ष श्री. चेतन शहा, उद्योजक श्री. महेश शहा, श्री. रणजित बक्षी, श्री. सुनील दोडेजा आणि सी.ए सुश्री. आशा घोषाल उपस्थित होते. सर्व पाहुण्यांना केंद्राची पाहणी करवण्यात आली. कार्यक्रमात वाशी परिवार फाउंडेशनचे श्री. मदन डोडेजा यांनी सन्मानीय तुषार गांधी यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यांच्या स्वागतपर भाषणानंतर श्री. मोहन डोडेजा आणि डीबीएम इंडियाचे श्री. परमजीत सिंग यांनी कौशल्य विकासाद्वारे सामाजिक बदलाचा दृष्टिकोन मांडला. श्री. तुषार गांधी यांनी आपल्या प्रेरक भाषणात कौशल्य प्रशिक्षणाचे समाज परिवर्तनातील योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, "कौशल्ये शिकवणे म्हणजे तरुणांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाला बळकट करणे होय."
जीडीए अभ्यासक्रमासाठी टेक महिंद्रा फाउंडेशनच्या स्वप्ना शेट्टी आणि ईसीसीईडी अभ्यासक्रमासाठी मुक्तांगणच्या झैनब यांनी आपले योगदान सादर केले. तीन स्वतंत्र संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांना बॅग वाटप करून दोन मिनिटांचे मनोगत व्यक्त केले. फरहीन यांनी संचालकांना स्मृतीचिन्ह म्हणून फ्रेम भेट दिल्या, तर श्वेताजी यांनी टेक महिंद्रा आणि मुक्तांगणला पुस्तके भेट देऊन आभार मानले. श्री. सूरज डोडेजा यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला.
*सामाजिक सक्षमीकरणाचा नवा पर्व* वाशी परिवार फाउंडेशन आणि डीबीएम इंडियाच्या सहकार्याने हे केंद्र तरुणांना आणि समुदायाला मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचा संकल्प ठेवते. तुर्भे केंद्रामुळे स्थानिक तरुणांना, विशेषतः महिलांना, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यक्रमाला स्वयंसेवी संस्था, समाज सेवक आणि समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता, ज्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
**नव्या स्वप्नांचा प्रारंभ** डीबीएम इंडियाने १८ वर्षांत हजारो कुटुंबांना शिक्षण आणि रोजगाराद्वारे सक्षम केले आहे. तुर्भे येथील हे केंद्र सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्थानिक समुदायाने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यामुळे तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल, असे मत व्यक्त केले.

0 टिप्पण्या