मला गोळ्या घातल्या तरी जी.आर. हातात घेतल्याशिवाय मी आझाद मैदान सोडणार नाही असा ठाम निश्चय करून आंदोलनास बसलेल्या जरांगेना पाचव्या दिवशी दिलासा मिळाला. जरांगेच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली कोर्टाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अखेर सरकारला आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय पर्यायच उरला नाही आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढाईला अखेर यश मिळालं. उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन संबंधित मागण्यांच्या अमलबजावणीबाबतचा मसुदा वाचून दाखवला. हैदराबाद गॅजेटियरची तातडीने अंमवलबजावणी करण्याच्या मागणीनुसार ती अंमवलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने मान्य केला आहे. तसेच शिवेंद्रराजेंनी सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला आहे. याबाबत तातडीने जी.आर. देखील सरकारकडून काढण्यात आला आहे. जर जीआरमध्ये फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकपण मंत्री फिरु देणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. जीआरमध्ये काही चूक झाली तर तो जीआर फेकून देऊ असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. .
मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीस उपसमितीने मान्यता दिली आहे, याचा अर्थ हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याची सूचना उपसमितीकडून देण्यात येईल. सातारा गॅजेटबद्दल मागणी केली होती, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठा यामध्ये येतो. औंध आणि सातारा मध्ये काही त्रुटी आहेत. पुढील 15 दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल, असे शासनाने म्हटले आहे. मराठा आणि कुणबी आहे असा जीआर काढा, मराठा कुणबी एकच हा जीआर जारी करा. त्यावर, ते म्हणाले किचकट आहे त्याला वेळ लागेल म्हणे, 1 महिना लागेल. पण, मी म्हणतो त्याला 2 महिने घ्या पण जी आर काढा. आता सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो. ते म्हणताय याला वेळ लागेल, 8 लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे. आता, हैदराबाद आणि सातारा या 2 गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. बाकी 5 मागण्यांचा शासन निर्णय काढू म्हणत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.हैद्राबाद गॅजेट अंमलबजावणी साठी मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देऊ, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करू. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो. सातारा संस्थान गॅजेट अंमलबजावणी बाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेता येईल. 15 दिवसात तपासू अंमलबजावणी देऊ...( काही त्रुटी आहेत त्यामुळं थोडं वेळ लागतो ) महाराष्ट्रातील केसेस बाबत गुन्हे मागे घेतले जे राहिले ते कोर्टात जाऊन मागे घेऊ. सप्टेंबर अखेर पर्यंत केसेस मागे घेऊ... असा जीआर काढला. मराठा आरक्षण आंदोलन बलिदान दिलेल्या लोकांना मदत आणि शासकीय नोकरी द्यावी. आंदोलक वारसांना आतापर्यंत 15 कोटी मदत केलीय, उर्वरित कुटुंबयाना 1 आठवड्यात मदत मिळेल. मराठ्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, व्हॅलीडीटी अडकल्या आहेत , त्याही द्या. विखे समितीने ठरवले आहे याबाबत माहिती घेऊन दाखले निकाली काढण्यास सांगतोय,
जिल्ह्याला प्रत्येक सोमवारी याबाबत बैठक होईल. यापूर्वी जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हते आता मनुष्यबळ दिले आहेत त्याला गती येईल. कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे. हैदराबाद गॅजेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नाही आहे. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ नंबर्स (लोकसंख्या) आहेत. त्यात स्पष्टता नाही. ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी आश्वासने सरकारच्या वतीने आंदोलनकर्त्यांना देण्यात आली आहेत. माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाले. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण आहे. याआधी विदर्भात आणि खानदेशात आपण नोंदी दिल्या असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढला म्हणून 1967 पूर्वीपासून मराठवाड्यात राहणाऱ्या सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार का?? GR मधील शेवटचा पॅराग्राफ वाचल्यानंतर त्याची शक्यता खूपच कमी असल्याचे समजते. शिंदे समितीने पूर्वी शोधलेल्या नोंदींच्या आधारे काही मराठा बांधवांना मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत. सध्याच्या घडीला ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याशी वंशावळ जुळवून आत्ताही भावकीला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. आजच्या GR मध्येही तीच गोष्ट नमूद केल्याचे भासते, फक्त शब्दांमध्ये बदल आहे. भावकी मध्ये एखाद्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर भावकी मधील दुसऱ्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेल. मग जुन्या GR मध्ये आणि नवीन GR मध्ये नेमका फरक काय? यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे, मराठवाड्यातील त्या मराठा कुटुंबांचे काय ज्यांच्या नोंदीच सापडल्या नाही आणि त्यांच्या भावकी मध्ये कुणबी प्रमाणपत्रच नाहीत? त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठवाड्यातील मराठ्यांना फसवले आहे का? असा प्रश्न बहुतेकांच्या मनात आहे...
मराठ्यांनो थोड थांबा! सरकार गडबड करतेय. दादानी मला जीआर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती. मी सत्य सांगितले, पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नाही. ज्याच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जीआर चा फायदा होईल. परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत , त्यांना याचा काहीही फायदा नाही, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. किंवा सोप्या भाषेत ज्यांना शिंदे समिती च्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल. ज्यांच्या गावात , कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचे काय? याची स्पष्टता आणावी लागेल. त्यामुळे या जीआर मध्ये सुधारणा आवश्यक आहेत. त्यात स्पष्टता आणावी आशी विनंती मि दादांच्या कडे करतोय. शेवटी, शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच ईच्छा. तसेच या जी आर ला अनेक अंगाने कोर्टात चॅलेंज केले जाऊ शकते. दादाला बोलावे म्हणतोय, अजून अनेक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत. पण मला बाहेर काढले गेले आहे.
- adv योगेश केदार 9823620666


0 टिप्पण्या