Top Post Ad

डॉ. कमलताई गवई... राजेंद्र गवई... आणि आरएसएसचा दसरा महोत्सव

 आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त  5 ऑक्टोबर रोजी अमरावतीत होणाऱ्या दसरा महोत्सव  कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कमलताई गवई  या उपस्थित राहणार आहेत. कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं असल्याची माहिती आहे. कमलताई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई  यांच्या मातोश्री आहेत. श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.  आरएसएसच्या वतीने प्रमुख वक्ता म्हणून प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक आणि   आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य जे. नंदकुमार उपस्थित राहणार आहे.    कमलताईं यांच्या  निमंत्रणावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. उलट सूलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कमलताई गवई या  कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशा आशयाचं एक पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यात आपण आंबेडकरी विचारांच्या असून तो विचार सोडणार नाही असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र हे पत्र बनावट असल्याचे आणि  कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी अप्रत्यक्षपणे प्रसार माध्यमांना सांगितलं आहे.

या संबंधी बोलताना राजेंद्र गवई म्हणाले की, "दादासाहेब गवई यांचे भाजप नेत्यांशी जवळचे संबंध होते. देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची विचारधारा वेगळी असली तरी राजकारणापलिकडे त्यांनी मैत्री जपली होती. त्यामुळे एखाद्या वेगळ्या विचारसरणीच्या कार्यक्रमाला गेले तर आपली विचारधारा बदलेल असं काही नाही. अशा कार्यक्रमाला जावं. आम्ही कधीही सत्तेच्या मागे गेलो नाही. दादासाहेबांना या आधी मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर होती, पण त्यांनी विचारधारा बदलली नाही. मलाही अनेकदा ऑफर देण्यात आल्या, तरीही आपण विचारधारा बदलली नाही. भूषण गवई आता मोठ्या पदावर गेले आहेत. त्यामुळे या गोष्टीवरून काही चर्चा होते. मी आईसाहेबांच्या पाठीशी आहे. त्यांनी कोणताही निर्णय घ्यावा, मी खंबीरपणे मागे असेन असं राजेंद्र गवई म्हणाले.

कमलाताईंच्या संभाव्य उपस्थितीवरून वाद निर्माण झाला असला, तरी इतिहास वेगळंच सांगतो. 1981 साली झालेल्या आरएसएसच्या शिक्षा वर्गाच्या समारोपाला रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कमलाताईंचे पती रामकृष्ण गवई हजर होते. तेव्हाच्या दैनिकांमध्ये  छायाचित्रही छापून आलं होतं.  या कार्यक्रमाला कमलताईंनी जावं अथवा नाही यावरून बरेच मतप्रवाह दिसून येत आहेत. मात्र रामकृष्ण गवई असोत किंवा त्यांच्या पश्चात श्रीमती कमलताई गवई असोत, गवई परिवाराने समाजिक सौहार्द जपलेलं असल्याचे नेहमीच दिसून येते.  मात्र
  रामकृष्ण गवई यांच्या निधनानंतर इतक्या वर्षांनी आताच का म्हणून आरएसएसतर्फे कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. देशात संविधान बदलाच्या चर्चा विरोधकांकडून नेहमीच केल्या जातात, त्या चर्चाना  आरएसएस   नेहमीच फेटाळत आले आहे. अशातच आंबेडकरी विचारधारेच्या पाईक म्हणवून घेणाऱ्या गवई परिवारातील व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून  विरोधकांना ठोस उत्तर देण्याचा आरएसएसचा प्रयत्न तर  नाही ना? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कमलताई गवई या उपस्थित राहतात हे औत्सुक्याचे राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com