बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात येऊन केंद्र सरकारने पारित केलेल्या रामजन्मभूमी बाबरी मशीदच्या धर्तीवर हिंदूसाठी वेगळे मंदिर निर्माण करा, अशी याचिका व्हाईस ऑफ इन्जीजिनियस पीपल्स ऑफ जस्टीस ॲण्ड पीस (व्हीआयपीजेपी) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भन्ते सुरेई ससाई यांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी २०१२ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मागणीसाठी अनेक संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्या सर्व याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरू केली आहे. त्यात व्हीआयपीजेपी या संस्थेने आपली याचिका २० ऑगस्ट २०२५ रोजी दाखल केली आहे. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी २९ ऑगस्ट रोजी न्या. एम.एम. सुंदरेस आणि न्या. एन. कोटीश्वर सिंग यांच्या पीठासमोर झाली. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर २०२५ला होणार आहे.
व्हाईस ऑफ इन्डजिनियस व्हीआय)चे अध्यक्ष ॲड. किशोर कांबळे म्हणाले की, चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली,असती, त्या बुद्धगया येथे महाबोधी महाविहाराची निर्मिती केली. भारतातून बुद्धधम्म नामशेष झाल्यानंतर ब्राह्मण पंडितांनी महाबोधी महाविहारावर कब्जा वेला, महाबोधी महाविहार ब्राह्मण पंडितांच्या ताब्यातून मुक्त व्हावे, याकरिता १८९१ पासून अनागरिक धम्मपाल यांनी लढा दिला. तो लढा १९३३ पर्यंत चालू होता. त्यानंतर १९९१ पासून भन्ते नागार्जून सुरई ससाई यांनी महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्यासाठी संघर्ष सुरू केला. २०१२ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून महाबोधी महाविहार ब्राह्मण पंडितांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी केली. अनेक संस्थांनी याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्या सर्व याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे चालू ठेवली.
त्या याचिकेत व्हीआयपीजेपीने सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली. त्या याचिकेत तीन मुद्दे मांडण्यात आले. त्यात पहिला मुद्दा म्हणजे इतर धर्मांचे अतिक्रमण दूर करणे, दुसरा मुद्दा म्हणजे बिहार टेम्पल ॲक्ट रद्द करून केंद्राचा कायदा बनविणे, तिसरा मुद्दा म्हणजे रामजन्मभूमी बाबरी मशीदच्या धर्तीप्रमाणे नुतनीकरण करून हिंदू धर्माचे स्थान इतरत्र स्थलांतरित करणे. ॲड. किरण कांबळे पुढे म्हणाले की, १९२६ मध्ये हिंदू महासभेने ब्रिटीश प्रशासनाकडे मागणी केली होती की, महाबोधी महाविहार प्रशासनावर ८ हिंदू व १ बौद्ध घेण्यात यावा. ब्रिटीश प्रशासनाने हिंदू महासभेची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हिंदू महासभेने हीच मागणी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे केली.
राजेंद्र प्रसाद यांनीही ही मागणी फेटाळून लावून बिहार टेम्पल ॲक्टची निर्मिती करण्यास सांगितले. त्यात ४ बौद्ध, ४ हिंदू व कलेक्टर यांची महाबोधी महाविहार समितीवर नेमणूक करण्याची शिफारस केली. तेव्हापासून हा कायदा अस्तित्वात आहे. भन्ते डॉ. नागार्जून सुरई ससाई यांनी बिहार टेम्पल ॲक्ट रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. आमच्या व्हाईस ऑफ इन्डजिनियस पीपल्स ऑफ जस्टीस ॲण्ड पीस (व्हीआयपीजेपी) संस्थेची मागणी आहे की, रामजन्मभूमी बाबरी मशीदच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात येऊन हिंदूंसाठी दुसऱ्या ठिकणी मंदिर बांधण्यात यावे, यासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे
0 टिप्पण्या