महारांना जी कामे वतनाच्या जमिनीच्या बदल्यात दिली होती, त्यातलं एकही "व्यवसाय" या स्वरूपाचं नव्हतं. गावची राखण महारांनीच करायची. न्यायनिवाड्याच्या कामात महाराला हजर रहावे लागे. महाराची साक्ष विश्वासार्ह समजली जाई. याखेर्रीज कोनताही गुन्हा घडला तर कोतवाल- महार म्हणून त्याला पाटील गुन्हेगार शोधायला पाठवत असे. मेलेलं जनावर ओढून नेणे, त्याची कातडी काढणे ही कामे करावी लागत. महाराला जी जमीन मिळायची ती पाणी नसलेली आणि नापीक असे. तिच्यात काहीही उगवत नसे. त्यामुळं महाराला गुजराण करण्यासाठी पाटलाने सांगितलेली कामे करावी लागत. पण त्याचं मोल त्याला मिळत नसे. जर कामे नाहीत केली तर शिक्षा केल्या जात. बहीष्कार केला जाई. महाराच्या विहीरीत अभद्र वस्तू टाकल्या जात. चाबकाचे फटके दिले जात. त्याला गुरासारखे राबवले जाई. मग एव्हढं राबणार्या कामगाराला कापड चोपड, वहाणा, दिवाळी भेट , पगार आणि घर मिळत असेल ना ? तर अजिबात नाही.
युरोप आणि ब्रिटन मधे आफ्रिकेतून गुलाम नेले. या गुलामांना त्यांनी राबवले. पण रहाण्याची व्यवस्था लेली. अन्न दिलं. कपडे घेतले जात. महारांना यातले काहीही न देता राबवले जाई. दिवसभर राबवल्यानंतर झोपायच्या वेळेला त्याला बोलावून घेतले जाई आणि दहा बारा मैलावर पत्र पाठवायला सांगत. ते ही पहाटे पोहोचलं पाहीजे. महाराकडे ना घोडा ना गाडी. तो अनवाणी चालत जाई. इतर अस्पृश्यांपैकी मातंगांकडे दोर वळण्याचे काम असे. केरसुणी बनवायचं काम होतं. चांभाराकडे चप्पल बनवणे, दुरूस्ती हा व्यवसाय होता. हे कौशल्या पिढ्य़ानपिढ्या त्यांच्याकडे येई. त्यामुळं गावात जाच झाला तर ते दुसर्या गावाला जाऊन रहात. व्यवसाय कौशल्य असल्याने त्यांचं पोट भरत असे. काही जाती तमाशात बाया नाचवत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होई. त्यामुळं त्यांच्या वाट्याची बिनपगारी गुलामी टळली. ती फक्त महारांच्या वाट्याला आली. आणि ती का सहन केली ?कारण वतनाची जमीन. या जमिनीमुळे महाराने गाव सोडायचा विचार सुद्धा मनात आणला नाही. गाव न सोडल्याने ज्या कामातून कसलेही कौशल्य अंगी बाणवता येत नव्हते अशी सांगकाम्या पद्धतीची आणि थॅंकलेस काम करावी लागत. महार म्हणजे फुकट मजूर असा ग्रह गावकर्यांचा पण झालेला असे. ( आजही फेसबुके शेतकरी म्हणतात ना घाम गाळणे म्हणजे काय ते तुम्हाला नाही कळणार ? आणि मजूर मिळत नाही, अव्वाच्या सव्वा मजुरी मागतात. या दोन्हीत विरोधाभास आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी महारांना शेतात राबवून घेतले जाई. त्याचा घाम हा घाम नाही. त्याचे कष्ट हे कष्ट नाहीत. बाबासाहेबांनंतर या समाजाला मजुरी मिळू लागली, पण ती सवर्ण मजूरापेक्षा कमीच. शहराकडे महाराला पैसा मिळू लागला म्हणून तो शहरात आला. तर आता शेतकरी ओरडतात कि यांना शेतात काम करायला नको. आता जर योग्य मजुरी दिली नाही तर कोण थांबणार ? पुन्हा म्हणतात कि शेतकयाला नुकसान सहन करावं लागतं. नफा झाल्यावर मग ते त्यातला काढून देतात का ? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,तुमचं शेत आहे तुम्ही राबा. नाहीतर जेव्हढे राबता येईल तेव्हढेच क्षेत्र करा. उरलेलं महाराला द्या. स्वत:च्या शेतात महार का राबणार नाही ? )
बाबासाहेबांनी वतन रद्द करायचा आग्रह धरल्याने चौकशी झाली आणि ही कामे बंद झाली. पण तरीही गावाची अपेक्षा तीच असते. तसेच या जमिनींना त्या काळी मोल नव्हते. आज आले आहे. आज या जमिनी आपल्य़ाच बापाच्या असल्यागत त्या लाटल्या जात आहेत. ज्या जमिनींसाठी कित्येक पिढ्यांनी शोषण सहन केले आहे. ती शासनाची कशी काय ? इनामदारांची जमीन पण इनामच आहे. वतनदार देशमुख, पाटील यांच्या जमिनी सुद्धा इतर हक्कातच आहेत. कूळांच्या जमिनी इतर हक्कातच आहेत. हे सगळे मालक बनले. या जमिनींचे मालक शासन नाही ? फक्त महारवतनाच्या जमिनीचे मालक शासन कसे काय ? हा समज यांनी करून घेतला आहे आणी पसरवला आहे.
शरद पवार, वसंतदादा पाटील. बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, उद्धव ठाकरे या सर्वांनी महाराष्ट्रात जमिनी लाटलेल्या आहेत. लवासा सिटीत आदिवासींच्या जमिनी हडप केल्या आहेत. वडगाव शेरी इथून जवळ वाघोली परीसरात बौद्ध विहाराची जमीन स्थानिक आमदाराने लाटली आहे. बावधन येथे शिवसेनेच्या आमदाराने विधवा महार बाईची जमीन घशात घातली आहे. तिथे रोसॉर्ट बनवले आहे. त्या बाईच्या कुटुंबाला मारहाण केली आणि तिच्यावरच पोलिसांनी केसेस केल्या. महार वतनाचा हा इतिहास आहे. आणि ज्या पुढार्यांना आज हे महार जोहार घालतात त्यांचाही. या महारांना विसर पडलाय कि काही वर्षांपूर्वी याच मंडळींनी कशा जमिनी लाटल्यात. पार्थ पवार मुळे जखमा ताज्या झाल्या आहेत.

0 टिप्पण्या