Top Post Ad

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नागपाडा येथील शेफर्ड विधवा आश्रमात सेवाभावी उपक्रम

भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लवलेन सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, माझगाव–भायखळा येथील महिला मंडळाच्या वतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री व स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली.या निमित्ताने नागपाडा येथील शेफर्ड विधवा आश्रमातील ज्येष्ठ महिलांना ब्लॅंकेट, पिण्याचे पाणी, बिस्किटे व फराळाचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास वैशाली सांगारे लाड, ज्योती मोहिते, भाग्यश्री जाधव, सुषमा वाघमारे, विद्याताई तपासे, कौसल्या ताई जगधने, शशिकला सोनवणे, उषा खरात, इंदुताई कांबळे, साळवी बाई, सुनीता खूपटे, रेश्मा येलवे, मंगल दिवार तसेच आश्रमाच्या प्रमुख विश्वास मॅडम यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सरचिटणीस शिरीष भाई चिखलकर यांनी केले. सामाजिक सेवेतून जयंती साजरी करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com