Top Post Ad

बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटीतर्फे आयोजित इव्‍हेण्‍टमध्ये मान्यवरांचा सहभाग

 इंडिया फाउंडेशनचे संस्थापक सीए शौर्य डोवल म्हणाले, ''भारताशिवाय जागतिक शांतता आणि जागतिक व्यवस्था अस्तित्वात असू शकणार नाही''  डोवल यांनी बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटीतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये चार्टर्ड अकाउंटंट्स समुदायाला मार्गदर्शन केले.या  इव्‍हेण्‍टमध्‍ये 'प्राचीन मुळे, जागतिक मार्ग: भारतीय सीएसाठी जागतिक नेतृत्वाची नवकल्‍पना' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

: बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी (बीसीएएस)द्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये आपले मत व्‍यक्‍त करत सीए शौर्य डोवल म्‍हणाले केले की, गेल्या दशकात जागतिक महासत्ता म्हणून भारताचा वाढता प्रभाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अधिकाधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. युनायटेड नेशन्‍स सिक्‍युरिटी कौन्सिलमध्‍ये कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी भारताचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असो किंवा जागतिक व्यासपीठांवरील भारताची स्वतंत्र आणि ठाम भूमिका असो, आज भारताला प्रमुख भू-राजकीय देश मानले जात आहे. त्‍यांनी विशेष उल्‍लेख केला की, दक्षिण आशिया, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि आता वाढत्या प्रमाणात युरोपमध्ये देखील भारताचा प्रभाव दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले की, भारत मोठी आर्थिक महासत्ता म्हणून देखील उदयास येत आहे, ज्‍यासह सध्या भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.


 डोवल पुढे म्‍हणाले की, भारताची मोठी क्षमता आता वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता क्षमता निर्माण करण्‍यावरून ओळखली जाईल. ते म्‍हणाले की, भारताने जगाला प्रतिभावान व्‍यक्‍ती दिल्‍या आहेत, पण आता भविष्‍य भारतीय बुद्धिमत्ता देण्‍यावर अवलंबून असेल. योग आणि आयुर्वेदाला मिळालेली जागतिक मान्यता यामधून भारताच्या बौद्धिक परंपरेला जगभरात स्‍वीकृती मिळत असल्‍याचे त्यांनी सांगितले. भारत जसजसा आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडेल आणि आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवेल, तसतसे जगाला भारताच्या बौद्धिक योगदानाचा फायदा होईल आणि भारताची विश्वगुरू म्हणून ओळख प्रस्थापित होईल. तंत्रज्ञान, आर्थिक विस्तार आणि बौद्धिक क्षमतेतील प्रगतीमुळे भारताच्या वाढत्या क्षमतेला आधीच जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. आपल्या व्यावसायिक आणि ज्ञानाचा वापर करत भारत वर्चस्व गाजवण्यापेक्षा जबाबदारीने जागतिक व्यवस्थांना आकार देऊ शकतो. 

या सत्रामध्‍ये चार्टर्ड अकाउंटंट्सनी झपाट्याने बदलत असलेल्‍या आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि फायनान्शियल क्षेत्रात आपल्या मूळ तत्त्वांशी बांधील राहून वाटचाल करावी यावर विशेष भर देण्‍यात आला.  या चर्चेमध्‍ये जागतिक अर्थव्यवस्थेत भावी प्रमुख घडवण्यासाठी नैतिक नेतृत्व आणि मूल्यांवर आधारित निर्णय घेण्‍याची क्षमता हे पायाभूत घटक असल्‍याचे निदर्शनास आले. 

आपल्‍या उद्घाटनीय भाषणामध्‍ये बीसीएएसचे अध्‍यक्ष सीए झुबिन बिलीमोरिया म्‍हणाले, ''यासारखी सत्रे आपल्या समुदायासाठी शिक्षण, संवाद आणि सामूहिक विचारांचे महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण करतात. विविध दृष्टिकोन आणि अनुभवी प्रमुखांना एकत्र आणून ही सत्रे चार्टर्ड अकाउंटंट्सना जागतिक अर्थव्यवस्थेतील नेतृत्वाच्या बदलत्या गरजांवर विचार करण्यास, त्‍याबाबत जाणून घेण्‍यास आणि स्वतःला सुसज्‍ज करण्यास सक्षम करतात. अशा प्रकारचे उपक्रम आपल्या व्यावसायिक समुदायाला आणि विचारांच्या व्यापक देवाणघेवाणीला अधिक प्रबळ करतात.'' 

बीसीएएसने उपस्थितांना अद्वितीय संधी दिली आहे, जेथे ज्‍योत फाऊंडेशन एक्झिबिशनचा मार्गदर्शित टूर 'वसुधैव कुटुंबकम की ओर ४: जगाला नवी दिशा देणारी १२ तत्त्वे' उपस्थितांना जागतिक नेतृत्‍वाबाबत अधिक सांस्‍कृतिक व तात्विक ज्ञान देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com