Top Post Ad

रत्नागिरी वाटद जि.प.नवनिर्वाचित सदस्या सौ.उषा सावंत यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

 

रत्नागिरी तालुक्यातील वाटद जि.प.गटाच्या नवनिर्वाचित सदस्या सौ.उषा राजेश सावंत यांचेवर या गटातील विविध गावांत, वाडी वस्तीतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गट हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो .या गटात विविध कंपन्या उद्योग सुरू आहेत .ग्रामीण भागातील लोकांना विविध विकास कामांच्या माध्यमातून सौ .सावंत यांनी आपल्या भागातील लोकांना विविध सोयी सुविधा पुरविल्याआहेत .


गेल्या पाच वर्षांमध्ये सैतवडे गुम्बद येथे ग्राम पंचायत सदस्य, सरपंच पदावर काम केले आहे.या  ९ फेब्रुवारी रोजी त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपला.७ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सौ .सावंत यांनी विजय मिळवून सरपंच ते मिनी मंत्रालय जिल्हा परिषद भवन रत्नागिरी येथे थेट जिल्हा परिषद सदस्या म्हणून उंच भरारी घेतली आहे. आपल्याला मिळालेल्या या यशाबद्दल त्यांनी या गटातील शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग, प्रमुख शाखाप्रमुख व शिवसैनिक त्याचबरोबर समस्त समाज बांधव बंधू भगिनींनी अतिशय मोलाची साथ दिली. त्याबद्दल त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे आभार मानले व त्याचबरोबर पती राजेश सावंत यांची अतिशय मोलाची साथ मिळाली .याबद्दलही त्यांनी आपल्या पतीचे विशेष कौतुक केले .लोकांनी टाकलेला विश्वास संपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करीन अशा प्रकारचा मनोदय त्यांनी आमच्या वृत्तपत्रकारांशी बोलताना केला.


कळझोंडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आयु.संदीप पवार, वृत्त पत्रकार सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी सौ.उषा सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आणि कळझोंडी धरण येथील कामकाजाबाबत चर्चा केली.

कळझोंडी सुंदरवाडी यांच्यावतीने  वाटद जि.प.सदस्या सौ.उषा सावंत व कळझोंडी पंचायत समितीच्या सदस्या सौ.अनुष्का खेडेकर, माजी पं.स.सदस्य व आगरनरळ गावचे माजी सरपंच अभय खेडेकर यांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी सुंदरवाडीचे प्रमुख यशवंत निंबरे, संजय शितप, चंद्रकांत वीर, विनायक दुर्गवळी, महिला मंडळाच्या सलोनी शितप, माजी सरपंच दिप्ती वीर, योगिता निंबरे,तेजल निंबरे,शामल शितप, धनश्री चौगुले आदी उपस्थित होते.

✍️*अमित कांबळे /विल्ये*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com