Top Post Ad

News म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेचे २७ ऑक्टोबरपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर "आमरण उपोषण" आंदोलन

बृहन्मुंबई महानगरपालिकेनील शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचात्यांचे अनेक प्रशासकीय, सवाविषयक, आर्थिक व कानदेशीर प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंधित आहेत. संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही यावर ठोस कारवाई झालेली नाही. महानगरपालिका शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याकरीता २७ ऑक्टोबर पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर "आमरण उपोषण"  आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्युनिसिपल समर्थ कामगार मुंबई (रजि.) नेे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तानटीने पूर्ण करून पाच मुख्याध्यापकांच्या सेवाज्येष्ठता यादीनुमार तात्काळ पदोन्नती देण्यात यावी. शासनस्तरावरून TET परीक्षा आयोजनात होणारा विलंब नक्षात घेता, पदोन्नतीमाठी TET सेवाज्येष्ठता अटींबाबत सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.  मागील १५ ते २० वर्षे पालिकेत सेवा देणा-या व अनुभवी मुख्याध्यापकांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांना योग्य न्याय मिळावा. चतुर्थ श्रेणीतील (सिपाही, माळी, रखवालदार, हमाल इत्यादी) रिक्त पदे तातडीने भरण्यात याबीत, माळी व रखवालदार यांना सलग ८ तामांची ड्यूटी देण्यात यावी. वारसा हकाने नोकरी मिळण्याचे प्रलंबित अर्ज कमाल ३ महिन्यांच्या आत मंजूर करण्यात यावेत. निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व आर्थिक दावे पुढील महिन्यात तातडीने निकाली काढावेत अथवा पूर्वीची जलद पद्धत पूर्ववत सुरु करावी, तसेच वैद्यकीय व स्वेच्छा निवृत्ती बदल्यांचा निपटारा जलदगतीने करावा. 

तसेच २०१९ पासून प्रलंबित असलेली वी.एड. वेतनश्रेणीची अंतिम यादी त्वरित प्रसिद्ध करून राज्य शामनाच्या वतींवर बी.एड. वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. उन्हाळी / दिवाळी सुट्ट्या व BLO कामाचा मोबदला म्हणून अर्जित रजा (EL) सर्विस बुकमध्ये नोंदवण्यात यावी. BLO म्हणून काम केलेल्या शिक्षकांचे प्रनंवित मानधन विनाविलंब देण्यात यावे.याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढावे. मराठा सर्व्हेक्षणासारख्या इतर कामांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे आणि भविष्यातील अशा कामांच्या मोबदल्याबाबत प्रशासनाने जबाबदारी घेऊन स्वतंत्र परिपत्रक काढावे. शैक्षणिक भत्ता फाईल मंजुरीसाठी निश्चित वेळेचे स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात यावे.  दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी २०१८ च्या परिपत्रकाची व कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, पदोन्नतीचा अनुशेष भरावा आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढावे, शिक्षण सेवकांच्या खात्यात दाखन दिनांक व SAP प्रणालीतील भिन्न दिनांकांची दुरुस्ती करून राज्य सरकारच्या नियमानुसार खात्यात दाखल दिनांक नोंदवण्यात यावा,

नवनियुक्त शिक्षण सेवकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अदा करण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्यात यावे. वॉर्ड स्तरावर प्रलंबित असणाऱ्या वारसा हक्क, गृहकर्ज ( मॅटर्निटी, बालसंगोपन रजा (CCL) व पुढील शिक्षणाची परवानगी अशा फाईली महिनानुमहिने प्रलंबित न ठेवता त्वरित मंजूरी देण्याबाबत परिपत्रक काढावे. एकाच वॉर्डात 3 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या प्रशासकीय अधिकारी शाळा व लिपिकांच्या नियमानुमार तातडीने बदल्या करण्यात याव्यात. BLO कामाची मर्यादा व चौकशी नियमानुसार एका शाळेतुन 4०% पेक्षा जास्त शिक्षक BLO कामासाठी पाठवण्यास मनाई करणे.  विद्यार्थ्यांचे शैैक्षणिक नुकमान लक्षात घेऊन शिक्षकांना BLO कामातून त्वरीत कार्यमुक्त करण्यात यावे. महिला प्रसुती शिक्षिकांच्या प्रलंबित समम्या परिपत्रकानुसार तातडीने मोडवण्यात याव्यात. माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक विभागाप्रमाणे सर्व MSR नियम लागू करण्यात यावेत. आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. 

प्रशासनाने वरील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिनांक २६ ऑक्टोबर पर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा व योग्य ते आदेश निर्गमित करावेत. जर दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्यास, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून  ऋषिकांत घोसाळकर (संस्थापक / सरचिटणीस, म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना) हे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर "आमरण उपोषणास" बसणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. उपोषणादरम्यान घडणाऱ्या सर्व प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभाग व पालिका प्रशासनाची राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com