Top Post Ad

ठाण्यात 5 एप्रिल रोजी धम्म परिषदेचे आयोजन

मनुच्या तोंडाला काळे फासणाऱ्या रणरागिणींचा होणार सत्कार
बुध्दरत्नसागर सोशल वेलफेअर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिनांक 5 एप्रिल रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये  सकाळी ९.०० ते सायं. ६.०० वा. पर्यंत  आठवी आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद २०२६चे आयोजन करण्यात आले आहे.  औरंगाबादमधील  कांताबाई अहिरे व शीला पवार यांनी जयपूरमधील राजस्थान हायकोर्टात उभा असलेल्या मनुच्या तोंडाला 8 ऑक्टोबर 2018 रोजी काळे फासले. या रणरागिणींचा सदर परिषदेत विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या धम्म परिषेदेचे उद्घाटन करणार असून या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू संघाचे भदन्त विशुद्धानंदबोधि महाथेरो हे मार्गदर्शन करणार आहेत. तर भदन्त विनयबोधि महाथेरो हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि प्रमोद प्रल्हाद इंगळे यांनी दिली. 

 भंते डॉ. राजरत्न धेरो, भंते फरा बुध्दश्री महायेरो, भंते शिलबोधी थेरो, भंते शिलकीर्ती थेरो, भंते बोधीधर्मा थेरो,  भंते सदानंद विपशी,  भंते उपगुप्त महाथेरो, भंते राहूल बोध्दी थेरो, भंते बोधीशिल थेरो, भंते शांतीरत्न थेरो, भंते के. आर. लामा भंते करुणासागर थेरो, भंते काश्यप थेरो, भंते धम्मरत्न थेरो, भंते बुध्दकिर्ती महाथेरो, भंते महामोग्गलायन थेरो, भंते संबोधी थेरो,  भिख्खुनि उप्पलवर्ण,  भंते आरा आनंद थेरो, भंते सदानंद थेरो, भंते निर्वाण थेरो, भिख्खुनि कल्याणी इत्यादी भिक्खूसघ या परिषदेस उपस्थित राहणार आहे.  

सकाळी ९.०० वा. पंचशील ध्वजारोहन व स्वागत, १०.०० वा. दिप प्रज्वलन व बुध्द वंदना, १०.३० वा. उ‌द्घाटन व मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, ११.३० वा भोजन  ०१.३० वा. बौध्द धम्म विचारमंथन व सामाजिक प्रबोधन   २.३० वा. चिवरदान व अष्टपरिक्कार अर्पण,  ४.३० वा. विशेष सन्मान व पुरस्कार वितरण, ५.१५ वा. कवी संम्मेलन, ६.३० वा. आभार व मैत्री भावना अशा प्रकारे धम्म परिषदेचे स्वरूप आहे  

या परिषदेत श्यामदादा आनंदा गायकवाड  निर्भिडकार जगन्नाथ मोरे , सुनिल दिपक खांबे  गंगाराम दोधा इंदिसे  सुखदेव किसन उबाळे  मा. प्रा.चंद्रभान बळीराम आझाद  भास्कर ईश्वर वाघमारे  पंढरीनाथ गायकवाड   रामभाऊ  तायडे   दिपक जाधव   शर्मिला रोहित पिंपळोलकर   दिव्या भूषण गोटे  पल्लवी शिवा जगताप  उषा विशाल वाघ  दर्शना योगेश जानकर  डॉ. वंदना शरद धाकतोडे  दिनेश जगन्नाथ ठाकरे  वनीताताई राजेंद्र गोतपगार  आनंद पटेल  किरन दिलीप केळकर    महेंद्र अनभोरे  डॉ. गौतम गोसावी  न्यायमूर्ती गुलाबराव अवसरमोल  अशोक पवार  प्रभाकर अनंता जाधव  आबासाहेब चासकर  भास्कर आरकडे  सुप्रसिध्द गायक दत्ता शिंदे   मिलिंद वानखडे  सुप्रसिध्द गायक सिध्दार्थ जाधव   यशवंत बिरारे  सुप्रसिध्द गायीका अलका तात्याराम झेंडे   डॉ. शरयु शरद  सोनाली मारुती गायकवाड  विशाखा विजय राजगुरु   वैशाली वसंत खरात   विमलताई भोईर  पदमा भगत  वनीता घोगरे  आरती वामन गायकवाड  सुरेश कांबळे  कांताताई आहिरे   शीलाताई पवार इत्यादी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी या धम्म परिषदेस अधिक संख्येने उपस्थित राहून धम्मश्रवण करावा असे आवाहन प्रमुख संयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि प्रमोद प्रल्हाद इंगळे यांनी केले आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com