Top Post Ad

व्हील चेअर कन्व्हर्शन किट"या प्रकल्पाला मुंबई विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक

 रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने "व्हील चेअर कन्व्हर्शन किट"या प्रकल्पाला मुंबई विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याने या प्रकल्पाची राज्यस्तरीय प्रदर्शनात निवड झाल्याने रत्नागिरीतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय तंत्र प्रदर्शन स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या संस्थेने" व्हील चेअर कन्व्हर्शन किट "या प्रकल्पात प्रथम क्रमांक पटकावल्याने या प्रकल्पाचे ५ मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शन स्पर्धेत औरंगाबाद येथे निवड करण्यात आल्याने या प्रकल्पाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .


कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने फेब्रुवारी अखेर विभागीय तंत्र प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विभागीय स्तरावर रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वेल्डर या व्यवसायात "व्हील चेअर कन्व्हर्शन "या प्रकल्पात प्रथम क्रमांक संपादन केला. या प्रकल्पाचे निदेशक- सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी मारूफ मो. शरीफ सुवर्णदुर्गकर, हर्षल जयवंत देवरुखकर, शुभम राजेंद्र शिंदे ,पार्थ मंगेश बोरसुतकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व टाटा कंपनीकडून टूलकीट देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरीय औरंगाबाद येथे निवड झाल्याने तमाम रत्नागिरीकर शिक्षण प्रेमी नागरिक, व्यावसायिक शिक्षण विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या वतीने या यशस्वी विद्यार्थी व निर्देशक सागर पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अमित कांबळे,रत्नागिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com