Top Post Ad

घरेलू कामगारांच्या वतीने महिला दिवस साजरा

प्रयास एका कोशिश आणि घरेलू कामगार विकास वस्तीस्तर संघ यांचा मार्फत दिनांक २२ मार्च . कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र - अंधेरी (पश्चिम ) येथे  घरेलू कामगारांच्या वतीने महिला दिवस साजरा करण्यात आला.. त्यात १५० घरकामगार महिला आणि त्यांना कामावर ठेवणा-या मालक वर्गाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात घरकामगार महिलांनी विविध जागृती गीते, संविधानिक मूल्यांवर जागृती नाटिका आणि घरेलू कामगारांना सद्य परिस्थितीत विविध ऑनलाईन कंपन्या मुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या मांडल्या. तसेच ज्या कंपन्या ऑनलाईन घरेलू कामगार पुरवतात त्या मुळे निर्माण झालेल्या कामगार हक्कां बाबत आलेल्या अडचणी आणि प्रश्नांवर एकत्रित चर्चा करण्यात आली.


या कार्यक्रमास सलाह संस्थेचे अध्यक्ष मधुकांत पाथारिया, गृह सेवा संस्थेच्या -  कार्यकर्त्या श्रीमती. लक्ष्मी नाईक, प्रयास एका कोशिश संस्थेचे कायेदेशीर सहयोगी - ऍड. दर्शन इंगळे, व तृतीयपंथी समुहाच्या प्रतिनिधी - श्रीमती. प्रेमा या उपस्थित होत्या. 

 मधुकांत पाथारीया यांनी घरेलू कामगारांना मार्गदर्शन करत आज घरेलू कामगार हा समाजाचा कणा आहेत, आणि घरेलू कामगार महिला ह्या कित्येक वर्ष आपल्या कामगार अधिकारांपासून वंचित आहेत तसेच समजात "घरेलू काम हे सन्मान जनक काम आहे आणि घरेलू कामगार हे कामगार आहेत" यावर मांडणी केली. तर श्रीमती लक्ष्मी नाईक यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाला रोखण्यासाठी, समाजात लिंगभाव सामानता आणणे  आणि महिलांनी संघठीत होऊन अन्याया विरुद्ध उभे राहीले पाहिजे यावर भर देत महिलांशी मनमोकळा संवाद साधला.

ऍड. दर्शन इंगळे यांनी घरेलू कामगार महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक दिवस हा सर्व कष्टकरी महिलांसाठी महिला दिनच असतो, व असला पाहिजे आणि आपल्या श्रम सन्माना साठी,घरेलू कामगार महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी सतत पुढे आले पाहिजे कामगार हक्काची लढाई ही लांब पल्ल्याची आहे आणि त्यात न थांबता सतत कार्यरत राहून आपल्या मागण्या या घटनात्मक अधिकारात बदल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन केले. 


या शिवाय महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली ज्यात सामाजिक कार्यकर्त्यां - श्रीमती सुंदरी ठाकूर, श्रीमती - ज्योत्स्ना दिघे, श्रीमती अनिता बागवे. घरेलू कामगार विकास वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा - श्रीमती किशोरी गावकर आणि समन्वयक- श्रीमती मंगला बावसकर ह्यांनी उपस्थिती लावली. 

ज्यांनी घरकामगार म्हणून घरकामगार महिलेला कामावर ठेवले आहे त्या मालक वर्गाने म्हणजेच कायदेशीर भाषेत नियोक्त्यांनी आपली मते मांडताना घरेलू कामगार ह्या त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत आणि त्यांच्या  कामाला सन्मान मिळाला पाहिजे.  शिवाय सामाजिक सुरक्षा हा घरेलू कामगारांचा अधिकार आहे यावर भाष्य करत येणाऱ्या काळात प्रत्येक घरेलू कामगारांसोबत नियोक्ता देखील कामगार हक्काच्या लढाईत सहभागी असेल. असे आश्वासन दिले. 

घरेलू कामगार महिलांच्या या वाटचालीत जे नेतृत्व उभं राहीलं आणि संघटन बांधणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या घरकामगार नेतृत्वाला गौरव देऊन ह्या कार्यक्रमात  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

संस्थेचे अध्यक्ष आशिष शिगवण यांनी कार्यक्रमात संस्थेने केलेल्या आता पर्यंतच्या वाटचातील घरेलू कामगारांचे योगदान मांडत. पुढील वाटचालीत उपस्थित असलेल्या सर्वांची साथ महत्वाची आहे सांगत सर्व उपस्थित मान्यवर, सहभागी आणि सहयोगी यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com