Top Post Ad

ठाणे महापालिकेचा ६,२२१ कोटींचा अर्थसंकल्प, ५७६ कोटींची वाढ,

 ५७६ कोर्टीची वाढ असलेला ठाणे महापालिकेचा ६,२२१ कोटी १२ लाख रुपयांचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी महासभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही, कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याचा संकल्प, क्लस्टर विकास, टर्शरी प्लांट आणि नाल्यांचे पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पांवर या अर्थसंकल्पात भर देण्यातत आला आहे. , केंद्राकडून अपेक्षित ५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज आणि २१०० कोर्टीच्या दायित्वाच्या बोजाखाली पालिका असल्याचे अर्थसंकल्पातून अधोरेखित झाले आहे. जुन्या कढीला नव्याने फोडणी देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आल्याची चर्चा आहे. लोककल्याण व सेवा दृष्टिकोन, शाश्वत व सुरक्षित शहर, हरित ठाणे, आनंद निर्देशांक, कला-क्रीडा सांस्कृतिक प्रगती, पर्यावरण संरक्षण व हवामान बदल उपाययोजना आणि एमएमआरमधील एक प्रमुख आर्थिक केंद्र हे महत्त्वाचे पैलू अर्थसंकल्पात ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी महासभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना अर्थसंकल्प सादर केला. सोबत उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते.

प्रशासकीय राजवटीतील कामांचा आढावा- प्रशासकीय राजवटीत आलेल्या २५०० कोटींच्या निधीचा विनियोग कसा झाला, असा सवाल नगरसेवकांकडून केला जात आहे. परंतु, त्याचे उत्तर पालिकेने थेट अर्थसंकल्पातून दिले आहे. गेल्या पाच वर्षांत आलेले उत्पन्न आणि झालेला खर्च तसेच गेल्या तीन वर्षातील ताळेबंददेखील या अर्थसंकल्पात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्पन्नवाढ, खर्च नियोजनावर भर- एकूणच सर्व योजना, अभियान व प्रकल्पांसाठी २०२६-२७ मध्ये महसुली खर्च ३८१८ कोटी १७ लाख, भांडवली खर्च २,४०१ कोटी ५५ लाख, अखेरची शिल्लक १ कोटी ४० लाख अशा एकूण ६,२२१ कोटी १२ लाखांचा खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात आले आहेत. यात महसुली उत्पन्न वाढविणे व खर्चाचे योग्य नियोजन यावर विशेष भर देण्यात आला आहे.

पालिकेवर २१०० कोटींचे कर्ज असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. परंतु, १ हजार कोटी राज्य सरकारकडून विविध विकासकामांसाठी येणे शिल्लक आहे. ते वगळल्यास पालिकेवर ११०० कोटींच्या आसपास कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी १९८ कोर्टीचे बिनव्याजी कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने ५०० कोटींचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्थायी समिती स्थापन न झाल्याने आयुक्त राव यांनी अर्थसंकल्प थेट महासभेत महापौरांना सादर केला. नालेसफाईसाठी 'स्मार्ट' उपाय, ठाण्यात रोबोटिक यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोस्टल रोड, फ्री वेचा विस्तार, अंतर्गत मेट्रोचा विकास, टिकुजिनी वाडी- बोरिवली या टनेलच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com