ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये, ही कारवाई सुरु आहे. मात्र दुसरीकडे लोकमान्य नगर पाडा नंबर २ लाकडी पूल नाका येथे कारभारी नामक व्यक्ती चे व्यावसायिक अनधिकृत बांधकाम खुले आम सुरू आहे. एकच व्यक्ती कारभारी नामक यांचे लोकमान्य ब्लॉक ६८,आणि ३८ ला देखील अनधिकृत बांधकामे चालू आहेत मात्र त्याकडे पालिका प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई केवळ कागदावरच आहे का असा सवाल ठाणेकर विचारत आहेत. याबाबत सहा.आयुक्तांना वारंवार कळवून देखील ते याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ठाणेकर करीत आहेत. दरम्यान अतिक्रमण विभागामार्फत शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरात असलेल्या ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र लोकमान्य नगरमधील या अनधिकृत बांधकामांना कुणाचे अभय आहे असा सवालही उपस्थित होत आहे.


0 टिप्पण्या