Top Post Ad

महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ मध्ये आता अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रार नोंदवा

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुंबईतील अनधिकृत पथविक्रीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेडून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांना ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर यासंदर्भात तक्रारी नोंदवता येतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनात नागरी समस्यांबाबत तक्रारी, सूचना आणि प्रतिक्रिया नोंदविण्याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे. याच धर्तीवर, अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रारींसाठी सुविधा उपलब्ध केली आहे. 

रस्ते, खड्डे यासह अन्य विविध सुविधांबाबत नागरिकांकडून महानगरपालिकेकडे १९१६, समाज माध्यमे आदी माध्यमांतून तक्रारी व सूचना येत असतात. तसेच, तक्रारींसाठी ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा देखील कार्यान्वित आहे. तथापि, महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना अधिक व्यापक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदापासून ‘MyBMC MARG’ (Management and Redressal of Grievances) ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 

दरम्यान, अनधिकृत पथविक्रीच्या अनुषंगाने तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिकांना व्हॉटस्ॲप क्रमांक उपलब्ध करुन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत महानगरपालिकेने ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावरील ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ मध्ये अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. 

यामध्ये मराठी भाषेत - ‘नमस्कार- मराठी- नागरिक- नागरी सेवा- तक्रार निवारण- तक्रार सबमिट करा- तक्रार प्रकार- फेरीवाले- बेकायदेशीर फेरीवाल्यांचा उपद्रव- ठिकाण- थेट छायाचित्र’ या क्रमानुसार जाऊन तक्रार नोंदवता येईल. 

तसेच, इंग्रजी भाषेत - ‘Hi – English – Citizen – Civic Services – Grievance Redressal – Submit a complaint – Compaint Type – Hawker - Nuisance of illegal hawking – Location – Image (Live Photo)’ या क्रमानुसार जाऊन तक्रारीची नोंद करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com