वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची आज मंत्रालयात टीईटी पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर अधिकृत बैठक पार पडली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि अधिकारी बैठकीत उपस्थित होते.टीईटी पेपरफुटी प्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत १२ मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले होते. १३ जुलै रोजी पुन्हा शिक्षणमंत्र्यांच्या सोबत बैठक झाली. त्यांनी १२ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य केल्या होत्या. आज उर्वरित मागण्यांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाली.

0 टिप्पण्या