Top Post Ad

Bookpublished चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार'....व्यंगचित्रांच्या माध्यमातून म्हणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा भाग असलेल्या जुन्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत सोप्या, रंजक पद्धतीने पोहोचावेत या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या 'चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार' या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे संपादक संजय मिस्त्री, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, चारूहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत, विवेक प्रभूकेळूसकर, उमेश कवळे आदी महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली म्हणी आणि वाक्प्रचारांवरील चित्रे समाविष्ट आहेत. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "हजार काम एक चित्र करते आणि हजार अनुभवांचे ज्ञान एक म्हण देते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीतीने जसे नीतीमूल्ये शिकवली, तसेच काम या म्हणी आणि वाक्प्रचार करतात. जे सांगायला निबंध लिहावा लागेल ते एका ओळीची म्हण सांगते."   आजच्या पिढीपासून हा अमूल्य ठेवा दूर होत चालला आहे. तो पुन्हा रुजविण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे मत पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले. जुन्या काळातील म्हणी हसत-खेळत, हलक्या-फुलक्या पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हाच या पुस्तकामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.

हे पुस्तक Amazon वर तसेच ओला वाकोला बँक्वेट, सांताक्रूझ येथे उपलब्ध आहे. पुस्तकासाठी 9702386767 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com