केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचे काय. आंदोलक तरुणांवर आणि युवतींवर झालेला लाठीचार्ज, तसेच साध्या वेषात गुंड घुसडल्याचा आरोप... या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का, तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही आणि पोलिसांच्या दंडुकशाहीवर कारवाई झाली नाही, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या आंदोलनाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. २० जुलै रोजी झालेल्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमार आणि अमानुष कारवाईविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आता थेट न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहे.
डिजिटल पुरावे गोळा करणार: आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीचे, बळाच्या वापराचे सर्व व्हिडिओ आणि फोटो एकत्र करण्यासाठी CJP एक स्वतंत्र वेबसाईट लाँच करणार आहे.दोषी पोलिसांवर FIR ची मागणी: देशातील नागरिक आणि आंदोलकांकडून मिळालेल्या या डिजिटल पुराव्यांच्या आधारे दोषी पोलीस अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर FIR दाखल करण्यासाठी CJP न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
आंदोलक भूमिकेवर ठाम: पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या कारवाईला कायदेशीर आव्हान देऊन दोषींना शिक्षा मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा CJP नेत्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता दिल्ली पोलीस आणि प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कायदेशीर लढाईत पुढे काय घडणार? पोलिसांवर कारवाई होणार का?

0 टिप्पण्या