दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करताना त्यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीची भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप लोकशाहीपेक्षा दडपशाहीवर विश्वास ठेवतात, अशी टीकाही त्यांनी केली. संसदेत आवाज उठविण्याबरोबरच रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी सर्व विरोधी पक्षांना केले.विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे जनतेमध्ये मोठा संताप असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा करून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
: विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला याचा निषेध आहे आणि शासनाचा विरोध करण्याचं महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
, ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असा आव्हान करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावं. दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला, याचा निषेध आहे. शासनाच्या या कृत्याचा विरोध करण्याला महाराष्ट्राने सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी आवाहन करत म्हटले की, यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे. ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत, त्यांनाही आम्ही असा आवाहन करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत, अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे. असे आंबेडकर यांनी म्हटले.
ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, टेरोटोरिआ आर्मी ही स्टँडबाय वरती ठेवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये रिझर्व पोलिस फोर्स ठेवण्यात आला आहे त्याला सुद्धा स्टँडबाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
या लाठी हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले की, जो लाठी हल्ला झाला त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला या अत्याचाराचा निषेध आहे.
0 टिप्पण्या