Top Post Ad

jantarmantar protest महाराष्ट्रातील फुले-आंबेडकरी साहित्यिकांकडून केंद्र सरकारचा निषेध

नीट परिक्षा पेपर फुटी विरोधात दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या  विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील फुले- आंबेडकरी साहित्यिकांनी केंद्र सरकारचा  निषेध केला. तसेच राज्य सरकारने साहित्यिकांना दिलेले मानाचे पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा ही यावेळी करण्यात आली. आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक ज.व्ही.पवार, ज्येष्ठ लेखिका,कवयित्री उर्मिला पवार, ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत योगिराज बागुल, ज्येष्ठ सामाहिक कार्यकर्ते  सुबोध मोरे, मुख्तार खान आदी मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुमेध जाधव,  संजय सावंत  गौतम सांगळे यांच्यासह फुले - आंबेडकर, विचार मंच, मुंबईचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर  जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा निषेध म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थांनी मागितला आहे. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संघाच्या मुशीतले आहेत. ते राजीनामा देणार नाही अशी चर्चा होती. मात्र एवढ्या बलाढ्य सत्ते विरोधात विद्यार्थी लढले त्याचा हा विजय आहे. अशा अमानुष घटनेमुळे साहित्यिक अस्वस्थ होणे या मताचा मी आहे. त्यामुळे राज्य सरकारने साहित्यिकांना दिलेले मानाचे पुरस्कार परत करण्याच्या योगिराज बागुल यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करीत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक ज.व्ही.पवार यांनी सांगितले.

 नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र होत्या. पण केंद्र सरकार हिटलरशाही सारखी भूमिका घेत होते. त्यामुळे या केंद्र सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो असे  ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांनी स्पष्ट केले.  माझी मुलगी उच्च शिक्षित असल्याने पेपर फुटीनंतर मुले आणि पालकांची काय अवस्था होते. हे माझ्या कुटुंबाला अवगत आहे. नीट पेपर फुटीनंतर २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याला सावरायचे सोडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्रीय पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. विद्यार्थ्यांचे हे दुःख मला सहन होत नाही. एक लेखक म्हणून महाराष्ट्र सरकारने दिलेले पुरस्कार परत करून केंद्र सरकरचा निषेध करत असल्याचे साहित्यिक योगिराज बागुल यांनी सांगितले.
साहित्यिक योगिराज बागुल यांना महाराष्ट्र शासनाचा 'पाचट' आत्मकथनासाठी लक्ष्मीबाई टिळक स्मृती उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार (१९९९-२०००).  २. 'तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा' (विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे चरित्र) धनंजय कीर स्मृती उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार (२००४. २००५) महाराष्ट्र शासन. ३. गुणवंत कामगार पुरस्कार (कामगार मंत्रालय) सन २००४ महाराष्ट्र शासन आदी पुरस्कार मिळाले आहेत तसेच ते  १. ग्रंथ निवड समिती (डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र) BARTI,  २. अभ्यासक समिती (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र) BARTI  या संस्थांवर सद्स्य म्हणून कार्यरत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com