Top Post Ad

Reservation वर्गीकरणाच्या मागून जातीच्या भिंती मजबूत करून परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे सरकारचे धोरण

सुप्रीम कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. तरीही महाराष्ट्र सरकारला आरक्षण उपवर्गीकरण करण्याची घाई लागली आहे. एकोणतीस राज्यांपैकी  सगळ्यात मोठे उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार तिथे वर्गीकरणाचा निर्णय घेत नाही. तरीही महाराष्ट्र सरकार विनाकारण राज्यात असा आत्मघातकी निर्णय घेत आहे. कारण वर्गीकरणाच्या मागून जातीच्या - उपजातीच्या भिंती मजबूत करून परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे या सरकारचे धोरण आहे.  म्हणूनच आरक्षण उपवर्गीकरण समितीच्या माध्यमातून सर्व जातीचा एक जातीय सलोखा करणे आणि त्यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी मजबूत करता येईल यासाठी कार्यरत राहणे. तसेच दुसरीकडे सरकारच्या विरोधातला रेटा कायम कसा राहील या सर्व बाजूने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येत असल्याचे स्पष्ट मत  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष  अॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

दिनांक ३० जुन रोजीच्या, मुंबईतील एस.सी. उपवर्गीकरण विरोधी प्रचंड संख्येने शांततेत पार पडलेल्या महामोर्चानंतर  आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची पुढील दिशा कार्यक्रम याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यात आला.  ३० जुनच्या महामोर्चानंतर व त्यादिवशी व दुस-या दिवशी महाराष्ट्र राज्य विधानसभा अधिवेशनात एस.सी. राखीव मतदार संघातून निवडूण आलेल्या आमदारांनी सरकारला दिलेल्या निवेदणानंतर व राज्यविधानसभेत अनेक विधानसभा सदस्यांच्या प्रश्नांवर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री फडणविस यांनी सरकारने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही व याबाबत सरकार सर्व संबंधितांबरोबर चर्चा करून निर्णय घेईल अशा प्रकारचे निवेदन विधानसभेत दिले. या निवेदणानंतरही सरकारने राज्यात गोंधळाची परिस्थीती निर्माण केलेली असून उपवर्गीकरण रद्द होणार की नाही याबाबत संदिग्धता निर्माण केल्यामुळेच एस.सी. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती-महाराष्ट्र तर्फे संपूर्ण राज्यभरात जिल्हावार उपवर्गीकरणविरोधी विशाल मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्धार केला असून  २७ जुलै सोलापूर,  २८ जुलै धाराशिव, २९ जुलै बुलढाणा, ८ ऑगष्ट पूणे, ९ ऑगष्ट- नांदेड, १० ऑगष्ट-परळी, ११ ऑगष्ट अंबेजोगाई, २२ ऑगष्ट-नाशिक असे जवळपास १५ जिल्हयात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष  संजय खामकर यांनी दिली.

उपरोक्त मोर्चेव्यतिरिक्त राज्यभरात अनुसूचित जाती आरक्षण संवाद परिषदांचे आयोजन केले जाणार असून एवढे झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने एस.सी. उपवर्गीकरण निर्णय जर रद्द केला नाही तर हे आंदोलने तिव्र केले जाईल व त्यांची सुरूवात महाराष्ट्र बंदने करावी लागेल याची सरकारने गंभीर दखल घ्यावी व आरक्षण धौरण पूर्णपणे न राबविता, पदौन्नती धोरणे न राबविता, राज्यात नोकर भरती न करता सरकारने हे नसते उठाठेव करू नये, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी केले.

यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दिल्लीत, महाराष्ट्रात व इतर राज्यात होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.  विविध राज्यातील पोलिसांव्दारे विद्यार्थ्यांवर, अमानुष, लाठी हल्ला करणा-या केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निधेष करण्यात आला तसेच आजच्या महाराष्ट्र बंद मध्ये देखील सहभागी होवून समर्थन देण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com