रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा तसेच विविध पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (१९ जुलै २०२६) सेंट झेवियर स्कूल, महाड येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारत आगामी वर्षात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी रोटेरियन चेतन पालांडे यांनी अध्यक्षपदाची, रोटेरियन विकास सिंग यांनी सचिवपदाची तर रोटेरियन प्रदीप पवार यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली.यावेळी रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष समाजसेवा पुरस्कार डॉ. कैलास महादेव पवार आणि डॉ. गजानन बाळकृष्ण दळवी यांना प्रदान करण्यात आला. निर्भीड पत्रकारिता पुरस्कार संदीप शोभा जाबडे यांना, विशेष शब्द वैभव पुरस्कार गंगाधर शंकर साळवी यांना, तर कर्तृत्व गौरव पुरस्कार श्रीकृष्ण दत्तात्रय बाळ, सोनाली शैलेश चव्हाण आणि मनीषा दिलीप गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
तसेच रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या वतीने महाड व पोलादपूर तालुक्यातील समाजकार्य, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना रोटरी विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रदीप राजाराम पवार, भारती शेखर वडाळकर, सुनील भिमराज पवार, मंगेश नामदेव सुतार, सिद्धी राजेंद्र शिंदे आणि मनीषा प्रल्हाद सकपाळ यांचा समावेश होता. या कार्यक्रमास डॉ. शैलेश पालेकर, रोटेरियन अण्णाराया शीलवंत, रोटेरियन राहुल सुकाळे, रोटेरियन जॉन्सन डिसूजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
> "रोटरी क्लब हे जागतिक स्तरावरील सेवाभावी संघटन असून समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून समाजविकासासाठी कार्य करते. रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टमध्ये गुणवत्तापूर्ण कार्य करणारी टीम आहे. मावळते अध्यक्ष जॉन्सन डिसूजा यांच्या कार्यकाळात संस्थेने अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले. नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन पालांडे यांच्या नेतृत्वाखालीही संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास असून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा."— डॉ. शैलेश पालेकर, पीजीडी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१
> "गेल्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. सहकाऱ्यांची ऊर्जा आणि सेवाभाव पाहून माझे वय कमी झाल्यासारखे वाटते. नवनियुक्त अध्यक्ष चेतन पालांडे यांच्या नेतृत्वाखाली रोटरीच्या सातही फोकस क्षेत्रांमध्ये अधिक जोमाने काम सुरू राहील."— **जॉन्सन डिसूजा, पास्ट प्रेसिडेंट, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट
0 टिप्पण्या