Top Post Ad

ThanePatrakar ठाण्यात पुण्याच्या धर्तीवर पत्रकार भवन ?

ठाण्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी  गावदेवी मैदानाशेजारील भूखंड देण्याची ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर करीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यात भव्य पत्रकार भवन उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळील ३०० चौरस मिटर जागा ही  तत्कालीन जिल्हा पत्रकार संघ आणि विकासकाने  गैरव्यवहार आणि शर्तभंग केल्यामुळे  राज्य शासनाने  ताब्यात घेतली आहे. सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखीस्वरूपात केली. ही मागणी मंजूर करीत नामदार बावनकुळे यांनी येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या धर्तीवर भव्य पत्रकार भवनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढील कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकार भवनाच्या माध्यमातून मोठी सोय होणार आहे.

यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे  माजी अध्यक्ष कैलाश म्हापदी, कार्याध्यक्ष  दीपक शेलार, सेक्रेटरी राजीव डाके, खजिनदार राजा शेटकर, कार्यकारणी सदस्य अमर राजभर, निकेश शार्दुल, गजानन हरिमकर, नितीन दूधसागर, सारिका साळुंखे, प्रफुल्ल गांगुर्डे, सचिन देशमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस, ज्येष्ठ पत्रकार अनिल शुक्ला, गणेश भोईटे, संजय  पितळे  आदी पत्रकार उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन पत्रकार भवनासाठी जागा आणि त्यासंबंधीची माहिती देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने हे उपस्थित होते.

----------------------------------------------------------------

👉''''  ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अथक प्रयत्नाने पंचवीस वर्षांपूर्वी शासकीय जमिन मिळवून गावदेवी मैदान जवळ ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधण्यात आले होते.  ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष ब.के राऊत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील, खजिनदार शाम आटे, उपाध्यक्ष आबासाहेब चासकर, प्रभाकर म्हात्रे, आणि कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनाच्या पायाभरणी पासून मोठ्या मेहनतीने एका विचाराने हे भवन उभारणीचे काम केले.  ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सुरुवातीला नेमलेल्या विकासकाने फूटींगचे काम केले नंतर काम बंद केले.  काही दिवसांनी विकासक मे राजन शर्मा  यांचेशी करार करून दोन मजल्याच्या पत्रकार भवनची उभारणी करण्यात आली.  परंतू पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना अंधारात ठेऊन राजन शर्मा यांनी अनधिकृत बांधकाम करुन एक इमारत पत्रकार भवनाच्या शेजारी उभी केल्याने आपापसात वाद निर्माण झाले ठाणे जिल्हा पत्रकार संघाने त्या अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेला अर्ज दाखल केले.  

यामुळे विकासक राजन शर्मा यांनी कराराचा भंग करून लबाडीने ठाणे कोर्टात ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विरोधात दावा दाखल केला की, करारानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघ मला माझा हिस्सा देत नाही, परंतू विकासकाने त्याच्या हिस्स्याचे बांधकाम व्यावसायिकांना विकून टाकले आणि संघाच्या हिस्स्याचे बांधकाम संघाला हस्तांतरण न करता स्वतःच्या ताब्यात ठेवले. आणि कोर्टातील दावा चालू ठेवला दरम्यान अध्यक्ष ब के राऊत स्मृतीभंशाने आजारी पडले. त्यानंतर 2014 ला प्रभाकर पाटील यांची ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली   ज्यावेळी मा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिन शर्तभंगाची नोटीस मिळाली तेव्हा प्रत्यक्ष अध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस नारायण पाटील यांनी संपूर्ण माहिती जाणून  घेऊन काम हातात घेतले आणि पत्रकार संघाची केस चालविण्यासाठी स्वतंत्र वकील नियुक्ती केले.

सन्  2015 पासून अतिधोकादायक स्थितीत असलेल्या या पत्रकार भवनची इमारत ठाणे महापालिकेने पाडून टाकावी यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने सातत्याने पत्रव्यवहार केला. अखेर 10 सप्टेंबरला या इमारतीचे पाडकाम सुरू झाले. यानिमित्ताने ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या मालकीची व कब्जा वहिवाटीची जमिनीच्या वस्तूस्थिती बाबत दि 17 सप्टेंबर 2020 रोजी मा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ठाणे महानगरपालिकेचे  मा महापौर नरेशजी म्हस्के,  मा. आयुक्त , मा सहाय्यक आयुक्त नौपाडा विभाग यांना निवेदन देखील देण्यात आले. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या मालकीची व कब्जे वहिवाटीची जमिनीवरील वास्तूबाबत मा. ठाणे  प्रांताधिकारी साहेबांच्या पुढे वस्तूस्थिती मांडली. मा प्रांताधिकारी साहेबांच्या सुचनेनुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा चेंज रिपोर्ट हवा असल्याने नवीन कार्यकारीणीने मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला असता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या तत्कालिन अध्यक्षांनी  विरोधात हरकत अर्ज केला. ती केस अजूनही मा. सहाय्यक  धर्मादाय आयुक्तांकडे निर्णयासाठी आहे,

या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या बाबत चिंता व्यक्त केली आहे हे फक्त ठाणे शहरापूरते मर्यादीत पत्रकार भवन न राहत जिल्हा स्तरावर पत्रकारांचा विचार केला जाणार नसल्याचे दिसून येते या बाबत महसूल मंत्री ना बावनकुळे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाची वस्तुस्थिती प्रत्यक्ष भेटून सांगणार 👈   - आबासाहेब चासकर  (९८६७६१६२०६)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com