: महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात गेल्या नऊ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निर्मला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता विक्रोळी (प.) मुंबई येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, संदेश विद्यालय, पार्कसाईट येथे आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, समाजआदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श युवा पत्रकार पुरस्कार, क्रीडारत्न पुरस्कार, कलारत्न पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा, कला व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.
संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, निमंत्रित मान्यवरांना सस्नेह निमंत्रण देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. संस्थापक हेमंत नथू तांबे, व विश्वस्त श्री. गनीभाई शेख सर आणि सर्व संस्थेचे विश्वस्त मंडळ हितचिंतक मित्र मंडळी यांनी पुरस्कारार्थी, निमंत्रित मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

0 टिप्पण्या