Top Post Ad

‘जनता सरकार’च्या माध्यमातून देशव्यापी संघटन उभारणार - Manish Brahmabhatt

देशभरातील विविध सामाजिक व जनआंदोलनांना एका व्यासपीठावर आणून ‘जनता सरकार’च्या माध्यमातून देशव्यापी संघटन उभारणार असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टी (डेमोक्रेटिक)चे संस्थापक सदस्य मनीष ब्रह्मभट्ट यांनी शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले.  भ्रष्टाचार, पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा या प्रश्नांवर देशभर आंदोलने सुरू आहेत. मात्र ही आंदोलने स्वतंत्रपणे न लढता विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कामगार, सामाजिक संघटना आणि विविध समुदायांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे ब्रह्मभट्ट यांनी सांगितले. प्रस्तावित ‘जनता सरकार’मध्ये ५० टक्के जागा युवा व विद्यार्थ्यांसाठी आणि ३३ टक्के जागा महिलांसाठी ठेवण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या सूचना आणि मतांच्या आधारे संघटनेची रचना करण्यात येणार असून, यासाठी ‘जनता सरकार डॉट ऑर्ग’ संकेतस्थळ सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. नागरिकांना जोडण्यासाठी मिस्ड कॉल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय सरदार’, ‘जय भीम’ आणि ‘गुलामी अभी बाकी है’ हे पाच प्रमुख नारे या अभियानातून पुढे नेले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  केजरीवाल यांच्यावर आंदोलनातून निर्माण झालेल्या जनसमर्थनाचा राजकीय फायदा घेतल्याचा आरोप करताना, आम आदमी पक्षाने स्थापनेच्या मूळ मूल्यांपासून फारकत घेतल्याचे ब्रह्मभट्ट म्हणाले. तसेच अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील १२ जणांच्या कोअर टीममध्ये मूळ कार्यकर्त्यांना डावलून निवडक व्यक्तींना स्थान दिल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय प्रत्येक नागरिकाला सहा महिन्यांत न्याय मिळण्याची हमी, डिजिटल मतदान व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जनतेकडून डिजिटल रेटिंग यांसारख्या मागण्या त्यांनी मांडल्या. देशातील व्यवस्था बदलण्यासाठी ‘नेता ठीक करो’ अभियानाची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, ब्रह्मभट्ट यांनी केलेल्या आरोपांवर अरविंद केजरीवाल, अभिजीत दीपके किंवा कॉकरोच जनता पार्टीकडून अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. संबंधितांची बाजू समोर आल्यानंतरच या आरोपांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com