Top Post Ad

MMPS आयुष्मान भारत, एसटी सवलत, पोस्टाच्या योजनां... शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे  पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित आयुष्यमान भारत, एसटी सवलत कार्ड आणि पोस्टाच्या विविध योजनांच्या शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय योजनांचा लाभ पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे चीफ पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिबिराचा समारोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पोस्ट आपल्या दारी’ ही संकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात पोस्ट खाते अग्रेसर असल्याचे जायभाये यांनी यावेळी सांगितले. तर अधिस्वीकृती नसणार्या पत्रकारांनाही एसटी प्रवासात शंभर टक्के सवलत मिळावी, यासाठी मंत्रालयाने प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठविला असून, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ‘

शिबिरात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान वय वंदन योजनेसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच एसटी महामंडळाचे महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत कार्ड, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, आधार कार्ड, अपघाती विमा, पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) व ‘माय स्टॅम्प’आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

या शिबिराचे समन्वयक म्हणून राजेंद्र साळसकर यांनी काम पाहिले. यावेळी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, खजिनदार जगदीश भोवड, संयुक्त कार्यवाह राजेश माळकर, कार्यकारिणी सदस्य विनोद साळवी आणि राजेश खाडे उपस्थित होते. तर जीपीओचे अधिकारी विलास गावकर, राजेंद्र राणे, विजय चौलाखे, एसटीतर्फे धर्मेंद्र जाधव, योगेश तोडकर तसेच आयुष्यमान भारत योजनेतर्फे सुमित निगडे, प्रबोध पवार यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com