'द बॉम्बे आर्ट सोसायटी' या १८८८ साली स्थापन झालेल्या कला संस्थेच्या विद्यमान पदाधिकारी मंडळाने दि. ३ ऑक्टोबर २०२६ ला, 'निवडणुक नियोजन' जाहीर केलेले आहे. सदर विद्यमान पदाधिकारी सुमारे १५ वर्षांपासून "बॉम्बे आर्ट सोसायटी" च्या पदाधिकारी समिती सदस्यांच्या पदनामांनुसार 'पदावर' आहेत. २०२६ या वर्षात १३८ वे वर्ष पूर्ण केलेल्या या संस्थेने, अनेक स्थित्यंतरे, अडी-अडचणी, चढ-उतार आणि बरेच कांही कटु सत्य अनुभवलेले आहेत. "सार्वजनिक न्यास" असलेल्या या संस्थेच्या समस्त मतदारांमधील प्रामाणिक, पारदर्शक विचारांचे संस्कार असलेल्या आजीव सदस्यांनी, संस्थेचे "पुनरुज्जीवन" करण्याचा संकल्प केलेला आहे. हा 'संकल्प' प्रत्येक सजग कलाकाराच्या कला प्रजेला उर्जा देण्याच्या इराद्याने, प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी निवडणुक रिंगणात संकल्प पॅनेल उभे असल्याचे आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यावेळी "संकल्प पॅनेल" चे उमेदवार प्रा. विजय राऊत भावना सोनवणे, विठ्ठलराव बा. लोखंडकार, नंदकिशोर मानकर, प्रा. रमेश भोसले, प्रा. संजय साबळे, प्रा. दिपक रमेश पाटील, डॉ. मीनल राजूरकर आणि शिल्पकार अश्विन कदम उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना प्रा.विजय राऊत म्हणाले, मुळात ३ ऑक्टोबर २०२६ ही निवडणुकीची तारिख जाहीर केल्याचे फार कमी सदस्यांना ज्ञात आहे किंवा सदर निवडणूक जाहीर केल्याचे उशीरा समजले आहे. आपण, सर्व मतदार, मुंबई आणि मुंबई बाहेर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रा बाहेरही विखुरलेले असल्यामुळे आपणांस हया माध्यमाद्वारे माहिती देण्याचा एक प्रभावी प्रयत्न करीत आहोत. सर्व संवेदनशील आणि जागरुक मतदार असलेने आणि 'संकल्प' पॅनेल मधील प्रत्येक 'उमेदवार' हा विशेष म्हणजे संवेदनशील, जागरुक आणि प्रामाणिक दृश्य कलाकार असलेने, विद्यमान आणि १५ वर्षापासून कार्यरत (?) पदाधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणुक लढवित आहे. प्रत्येक सभासदाने मतदान करण्यास मुंबईत येवून मतदान करुन संस्थेचे जणु पुनरुज्जीवन करण्याची संधी देऊन प्रोत्साहन द्यावे अशी विनंती विजय राऊत यांनी माध्यमांद्वारे केली. .गतवर्षी १० ऑगस्ट २०२५ ला विद्यमान कमिटीतील "द बॉम्बे आर्ट सोसायटी"चे मा. सचिव ज्येष्ठ शिल्पकार चंद्रजित यादव यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. (आजही सार्वजनिक न्यास असलेल्या सदर सोसायटीच्या जबाबदार पदाधिकारी मंडळींनी "नोडल ऑफिसर" म्हणून नोंद असलेल्या शिल्पकार कै. यादव यांचेच नांव अदयाप बदललेले नाही, जे आजही सदर संस्थेच्या नावाने असलेल्या लिंक वर दिसते) इतकी सुद्धा संवेदनशीलतेची तमा न बाळगणार्या विद्यमान पदाधिकारी मंडळींनी तर असत्य, अपूर्ण आणि अधिकृततेचा कायद्यानुसार आधार नसलेली माहिती सर्व सोशल मीडियांवर जाहीर करीत एक प्रकारे जनतेची दिशाभूल तर केली आहेच.
तथापि "सार्वजनिक न्यासाचा" अक्षम्य अपमान केलेला आहे. म्हणून असल्या बेजबाबदार मंडळीना, ज्यांनी २०१५ पासून मा. थर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात नियमानुसार चेंज रिपोर्टच आज दिनांका पर्यंत सादर केलेला नाही. म्हणून जे मंडळ बेकायदेशीर आहे. त्यांना निवडणूक २०२६ मध्ये पराजित करून, संकल्प पॅनेल ला सभासद मतदारांनी विजयी करावे. कारण सकारात्मक आणि स्वच्छ काम फक्त अभद्र हेतु न ठेवणारे, पारदर्शक आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांचा सन्मान करणारे उमेदवारच करु शकतात. अशा सजग, संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले...
"द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या निवडणुकीत सचिव पदासाठी उभे असलेले उमेदवार डॉ. गजानन शेपाळ यांनी, विद्यमान समितीने जाहीर केलेल्या कामांची चिरफाड करीत अभ्यासपूर्ण विश्लेषण करून, त्यांच्या कथित कार्याचा परामर्श घेतला. यावेळी डॉक्टर गजानन शेपाळ यांनी 2019 ते 2026 सलग सात वर्षे सोसायटी आर्थिक नफ्यात होती तर त्याचे ऑडिट रिपोर्ट, बजेट मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयास वेळोवेळी का सादर केले गेले नाही. ते प्रलंबित ठेवण्याचा काय हेतू आहे ? 2019 ते 2026 सलग सात वर्षे सोसायटी आर्थिक नफ्यात होती तर बँकेकडून कर्ज का घेण्यात आले ? ते किती व कोणी घेतले? त्यासाठी सभासदांच्या बैठकीमध्ये मान्यता घेण्यात आली होती का ? त्या बैठकीचे इतिवृत्त सर्वाच्या माहितीसाठी का प्रसिध्द करण्यात आले नाही? कर्जासाठी मा. धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली होती का? किती कर्ज उचलण्यात आले ? कधी ?
तसेच जर संस्था सतत 7 वर्षे नफ्यात होती तर कर्जाची परतफेड फक्त 25% का झाली? सोसायटी नफ्यात असताना थकीत भाडे असण्याचे कारण काय? स्टॅम्प ड्युटी नोंदणी इ. चा खर्च यासाठी सुमारे 50 लाखांचा भरणा कोणत्या निधीतून झाला? त्याचा हिशोब मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयास का सादर केला गेला नाही ? कोविडच्या काळात कोणते कला उपक्रम सुरु ठेवण्यात आले ? ट्रस्ट डीडमध्ये अंतर्भूत असलेल्या विहित नियमांनुसार कोणत्या गरजू कलाकारांना किती रकमेची आर्थिक मदत करण्यात आली? याची स्वयंस्पष्ट माहिती विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही. त्याचा अहवालात उल्लेख करुन प्रमाणित यादी मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयास ऑडिट रिपोर्टमध्ये देणे आवश्यक असते. सुज्ञ सभासद व मतदारांना मोघम माहिती नको आहे. ठोस व पारदर्शक माहिती द्यावी असे आवाहन शेपाळ यांनी केले.
मागील १५ वर्षात जर बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कारभाराकडे डोकावून बघीतले तर २००२ पर्यंत मध्ये ही संस्था जहांगीर आर्ट गॅलरीच्या एका छोट्याशा खोलीत बंदिस्त होती. प्रा. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील नविन दमाच्या पॅनल ला २००२ साली यश मिळाले आणि ते या संस्थेवर आले होते. पुढे २०१० पर्यंत या पॅनल मधील लोकांनी या संस्थेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. म्हाडा ने काढून घेतलेला प्लॉट आमच्या नेतृत्वात परत आणण्या पासुन ते बांद्रा येथील कलासंकुल निर्मितीचे काम, लाइफ टाईम आणि इतरही महत्त्वाच्या अवॉर्ड्स ची संख्या या सोसायटीच्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या समारंभाच्या वेळी प्रदान करण्यास सुरुवात केली. परंतु २०१० नंतर निवडून आलेल्या लोकांनी २०१० ते २०२६ म्हणजे तब्बल १५ वर्षे या सोसायटीवर कार्यरत राहुनही कांहीही काम केले नाही. काही हौशी कलाकारांची मेंबरशीप्स वगळली तर व्यावसायिक कलाकारांना साधी मेंबर्स ची परिपूर्ण यादी देखील बनवता आलेली नाही.वार्षिक प्रदर्शना शिवाय यांनी इतर कुठलाही उपक्रम राबवला नाही. वार्षिक सभेमध्ये घेतलेल्या कुठल्याही निर्णयांची अंमलबजावणी १५ वर्षात सध्याच्या पदाधिकारी मंडळीनी केलेली नाही. संस्थेचा बिल्डर सोबत झालेल्या जागेच्या व्यवहाराचा गोंधळ अजुनही सोडविण्यात आलेला नसल्यामुळे संस्थेला इतर महत्वाचे कला उपक्रम राबविता आणि साजरे करता येत नाहीत. संस्थेकडे आर्थिक प्रायोजकांचे देणगी मिळवण्यासाठीचे उपाय असुनही यांच्या गोंधळामुळे हवे त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे संस्थेवर छोटे छोटे छंद वर्ग चालू करून खर्च भागवण्यासाठी प्रयत्न करायची वेळ आली आहे. १८८८ साली ज्या उद्देशाने ही संस्या स्थापन झालेली होती आणि भारतीय इतिहासात संख्येचे नांव मोठ्या आदराने घेतले जात होते त्या प्रतिष्ठेला १५ वर्षात विद्यमान पदाधिकारी मंडळींनी अधोगतीला पोहोचवलेले आहे.
ही संख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कला संस्था म्हणून उदयास आणून भारतीय संस्कृतीचा "आयकॉन" बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. अगदी १५ वर्षाची वस्तुस्थिती पाहण्या अगोदर २०१७ पासून मा. धर्मादाय आयुक्त, वरळी, मुंबई यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या विद्यमान पदाधिकारी मंडळीनी सादर केलेल्या दस्त ऐवजा नुसार जी माहिती पुढे आली त्या माहितीच्या आधारे आम्ही खालील मुद्दे अत्यंत खेदाने आपणांसमोर मांडत आहोत. सदर मुद्यांची कदाचित विद्यमान मंडळीमधील कांही पदाधिकार्याना कल्पनाही नसेल असे वाटते. ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. सदर तपशीलवार माहिती देत संकल्प पॅनेल च्या अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. विजय राऊत यांनी विद्यमान समितीच्या बेलगाम कारभाराची लक्तरे काढली. मुंबईतील बांद्रा उपनगरात "द बॉम्बे आर्ट सोसायटी" ची भव्य वास्तू आहे.
या संदर्भात तपशीलवार माहिती देतांना राऊत पुढे म्हणाले, विद्यमान पदाधिकारी मंडळींनी २०१७-१८ ला मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात जो ऑडिट रिपोर्ट ऑनलाईन सादर केला त्यामध्ये अक्षम्य अनियमितता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी २०१७-१८ नंतर २०२६ पर्यंत मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयाला फाट्यावर मारत फार सहजपणे गृहीत धरलेले आहे. पुढील कुठल्याही वर्षांचे ऑनलाईन ऑडिट रिपोर्ट सादर न करता केलेले आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. असे प्रा. विजय राऊत यांनी साक्षांकित कागदपत्रे पत्रकारांना दाखवून स्पष्ट केले.
या गंभीर बाबतीत त्यांनी कांही आकडेवारी स्पष्ट केली ती पाहता, विद्यमान समितीने बेदरकारपणे आणि बेकायदेशीर पद्धतीने आर्थिक व्यवहार केलेले आहेत हे निक्षून सांगितले. ते पुढे म्हणाले की, द बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई च्या २०१७-१८ च्या ऑनलाईन ऑडिट चे ज्यावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांची स्वाक्षरी आहे, कोषाध्यक्ष म्हणून प्रा. सुरेंद्र जगताप यांची स्वाक्षरी आहे. मग अध्यक्ष पदावर असलेल्या पद्मश्री वासुदेव कामत यांनी अचानक राजीनामा का दिला? त्यांना, विदयमान समितीच्या आर्थिक व्यवहारांची शंका आली का? असे आम्हाला प्रश्न निर्माण झाले असतांनाच, त्या ऑडिट रिपोर्ट कडे बारकाईने पाहिले तेव्हा पुढील प्रश्न उपस्थित झाले. यावर मा.धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयाला अंधारात ठेवण्याचा प्रकार या समितीने केलेला आहे, असा आक्षेपही राऊत यांनी नोंदवला.
1) Latest Audit Report submitted only 2017-2018 by CA Hemang Shah. Audit Report not submitted to Charity Office from 2018-19 to 2025-26 म्हणजे, 2018 पासून 2026 पर्यंत आजतागायत संस्थेचा कोणताही हिशोब केला नाही, त्याचे सीए कडून ऑडिट केले गेलेले नाही आणि ते चॅरिटी ऑफिसमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन सादर केले गेले नाही. (2) प्रत्येक वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात चॅरिटी ऑफिसला नियम 16 (अ) नुसार अंदाजित जमा व खर्चाची बजेटची कॉपी चॅरिटी ऑफिसमध्ये जमा करायची असते. ती देखील 2026 पर्यंत जमा केलेली नाही, (3) 2018 च्या बॅलन्सशीटनुसार 1.5 कोटी corpus fund तसेच रिझव्र्ह फंड रुपये 29,21,423/- आणि इतर फंड रुपये 24,93,250/- संस्थेकडे जमा होता. म्हणजे अर्वा तसेच कोटी रुपये होते. त्यात नंतर जमाखर्च होऊन आता 2026 रोजी किती corpus व रिझव्हपाजे जवळ जरकोट आहे? याची कोणतीही माहिती नाही. हा संस्थेचा राखीव फंड असतो, त्यातूनही खर्च झाल्याचे दिसते. 4) 2018 च्या बॅलन्सशीटनुसार रुपये 65,874/- advances दाखवले आहेत. ते कोणत्या ट्रस्टीने व कधी घेतले. त्यांची नावे जाहिर झाली पाहिजे. त्यामध्ये 2026 पर्यंत किती लोकांनी संस्थेमधून अॅडव्हान्स उचल घेतली आहे व कोणत्या नियमाप्रमाणे. त्याची सर्व माहिती कार्यरत ट्रस्टींनी दिली पाहिजे. अॅडव्हान्सचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एकूण अॅडव्हान्सच्या रकमेपैकी किती अॅडव्हान्सेस पुनःश्च संस्थेकडे जमा झाले आहेत. जमा न झालेल्या अॅडव्हान्सवर व्याज लावून त्यांच्याकडून वसुलीची कार्यवाही, संस्थेकडून नोटीसा बजावणे अशी कार्यवाही झाली आहे का? या बद्दल माहिती नाही.
5) SBI overdraft against FD 40 लाख घेतल्याचे दिसून येते. ते कशासाठी घेण्यात आलेले आहे ? अथवा कशासाठी खर्च झाले आहे? त्याचा कोणताही हिशोब नाही. एफडीवर घेण्यात आलेले हे 40 लाख पुन्हा जमा करण्यात आले आहे का? याचीही नोंद दिसत नाही. 6) 2018 च्या बॅलन्सशीट नुसार रुपये 1,74,92,882/- investments आहेत, त्याचा कोणताही तपशील नाही, ते कुठे गुंतवले गेले आहेत ? की 2026 पर्यंत पूर्ण खर्च झालेले आहेत, त्याचा हिशोब नाही. 7) संस्थेच्या सन 2018 पर्यंत रुपये 13,26,096/- च्या एफडी होत्या, त्याची 2026 रोजीची सद्यस्थिती काय आहे? याची माहिती द्यायला हवी. 8) रुपये 17,04,526/- चे डोनेशन 2018 साली मिळाले होते, त्यानंतर प्रत्येक वर्षी लाखो रुपये डोनेशन मिळते, त्याचा हिशोब नाही. त्याचे ऑडिट नाही, चॅरिटी ऑफीसमध्ये ऑडिट रिपोर्ट सबमिट केले गेले नाही. 9) 2018 च्या ऑडिट रिपोर्ट नुसार रुपये 14,73,145/- other expenses दाखवले आहेत. इतर किरकोळ खर्च जवळ जवळ 15 लाख करण्यात आलेला आहे. तो कशासाठी करण्यात आलेला आहे ? 10) 2026 पर्यंत संस्थेची किती बँक खाती आहेत? आणि त्यातील शिल्लक रक्कम किती आहे? याचा ऑडिट रिपोर्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. रुपये 37,30,815/-income as on balance 31.03.2018 आहे. मात्र खर्च रुपये 46,32,620/-झालेला आहे. हे संशय निर्माण करणारे आहे.
11) हे सर्व 2018 पर्यंतचे आहे. ते पण कितपत खरे आहे, माहिती नाही. कारण त्याआधीचे व नंतरचेही ऑडिट रिपोर्ट उपलब्ध नाहीत. मात्र त्यानंतर 8 वर्षे अनागोंदी व अनियमित व्यवहार झाल्याचे दिसून येते. पारदर्शक व्यवहार नसल्याने, त्याचे कोणत्याही सीए कडून ऑडिट झाले नाही. आणि ऑडिट रिपोर्ट धर्मादाय आयुक्त कार्यालयास ऑफलाईन व ऑनलाईन सादर केले गेले नाहीत. अशी माहिती प्राप्त झालेली आहे. 12) या शिवाय आणखी बर्याच अनियमितता दर्शवणार्या पुराव्यांची श्रृंखला आहे. यावर आम्ही न्यायालयात जाऊन सदर सार्वजनिक न्यासाला पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर वापरण्याचा प्रयत्न करणार्या विद्यमान समितीच्या तावडीतून सोडवून घेऊ.
1) उत्तम प्रशासन आणि वित्तीय नियोजन ठेवल्यासच कला आणि कलाकारांशी बांधिलकी जपली जाऊन संस्थेची भरभराट होऊ शकते अशी संकल्प पॅनेलची पक्की धारणा आहे. हाच संकल्प घेऊन आम्ही काम करणार आहोत. 2) सन 2019 ते 2026 पर्यंत कला व कलाकारांच्या संवर्धनासाठी केलेले काम, या कालावधीतील कोणतेही आर्थिक अहवाल इ. बाबी प्रमाणित करुन मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय, आयकर कार्यालय, इतर वित्तीय तथा प्रशासकीय कार्यालयांमध्ये सादर झालेले नाही. ही आर्थिक बेशिस्त आणि अपारदर्शकता आहे. आमचे पॅनेल ही अनियमितता दूर करुन उत्तम प्रशासन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा संकल्प करीत आहे.
3) नविन योजना जाहिर करुन त्याची अंमलबजावणी करणे यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते, त्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता म्हणजेच ट्रस्ट डीडमध्ये घटनेत नियमानुसार आवश्यक तो बदल मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक असते. ट्रस्ट डीडमध्ये अंतर्भूत नसलेल्या कोणत्याही बाबींवर खर्च झाल्यास ते नियमबाह्य आणि वित्तीय अनियमितता ठरते. यासाठी दंड आणि शास्तीची तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमामध्ये आहे. 4) इतक्या प्रशस्त व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू आणि संस्थेतून कला व कलाकारांसाठी व्यापक प्रमाणात कार्य होणे आवश्यक असताना फक्त ड्रॉईंग क्लासचा नफा होणे यातून 1.5 कोटींचा निधी 2.5 कोटींवर नक्कीच होणार नाही. त्यासाठी आर्थिक शिस्त आणि नियोजनाचा रोडमॅप संकल्प पॅनेलकडे तयार आहे. 5) कॉर्पस फंड, रिझर्व्ह फंड व इतर निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, सदरचा फंड हा संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा फंड असून, सर्व सभासदांच्या मान्यतेशिवाय त्यातून खर्च करता येत नाही. सर्वाना अंधारात ठेऊन त्यातून किती प्रमाणात खर्च करण्यात आला? याची माहिती विद्यमान समितीने देणे अत्यंत आवश्यक आहे.
6) कलादालने आणि ऑडिटोरियम बंद असण्याचे कारण काय? कला व कलाकारांच्या संवर्धनासाठी जर 7 वर्षे काम झाले असेल तर अशा बंद दालनातून कला व कलाकारांची कोणती बांधिलकी जपण्यात आली ? त्याचा खुलासा होणे आवश्यक आहे.. 7) ट्रस्ट डीडमध्ये नमूद ऑब्जेक्ट (विषय) नुसार कोणकोणती कामे 7 वर्षात झाली, व नमूद नसलेली कोणती कामे करण्यात आली व त्यावर किती खर्च करण्यात आला ? याची सर्वाना माहिती होणे आवश्यक आहे. 8) कित्येक वर्षे संस्था ही फक्त शोभेची वास्तू म्हणून राहिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर कला व कलाकारांच्या विकास व संवर्धनासाठी कोणतीही कामे तसेच विस्तार झालेला नाही.. 9) आमच्या सर्व अभ्यासू कलाकारांकडे उत्तम प्रशासकीय जाण, आर्थिक सूजपणा, कलेचा प्रदीर्घ अनुभव आणि व्यापक दृष्टीकोन असून आम्ही संकल्प पॅनेलद्वारे सर्व कलाकारांच्या संवर्धन आणि कलेच्या विस्तृत प्रचार आणि प्रसारासाठी या सोसायटीच्या माध्यमातून सर्वसमावेशक काम करण्याचा संकल्प यावेळी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी जाहिर केला.


0 टिप्पण्या