Top Post Ad

पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन

जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या National Quality Assurance Standards (NQAS) गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन प्राप्त केले असून, मूल्यांकनात एकूण 90.97 टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे.


NQAS अंतर्गत आरोग्य संस्थांच्या सेवा आणि सुविधांचे विविध गुणवत्ता निकषांवर सविस्तर मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, रुग्णांचे अधिकार, क्लिनिकल सेवा, संसर्ग नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन, औषधांची उपलब्धता, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, नोंद व्यवस्थापन तसेच रुग्ण समाधान आदी बाबींचा समावेश आहे. पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने या सर्व प्रमुख निकषांमध्ये समाधानकारक कामगिरी करत राज्यस्तरीय NQAS मानांकन प्राप्त केले आहे.

*विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी*...पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या NQAS मूल्यांकनात आरोग्य संस्थेच्या विविध विभागांनी निर्धारित गुणवत्ता निकष पूर्ण केले आहेत. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) 95.33 टक्के, प्रयोगशाळा 94.33 टक्के, प्रसूती कक्ष 86.40 टक्के, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम (NHP) 92.39 टक्के, आंतररुग्ण विभाग (IPD) 89.58 टक्के आणि सामान्य सेवा 88.22 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या सर्व विभागांच्या एकत्रित कामगिरीतून पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने 90.97 टक्के एकूण गुण प्राप्त केले आहेत.

*रुग्णकेंद्री सेवांमध्येही उत्कृष्ट कामगिरी*.....NQAS अंतर्गत विविध Areas of Concern (AoC) मध्येही पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगली कामगिरी केली आहे. Service Provision – 86.63 टक्के, Patient Rights – 90.85 टक्के, Input – 86.98 टक्के, Support Services – 88.46 टक्के, Clinical Services – 92.91 टक्के, Infection Control – 95.66 टक्के, Quality Management – 92.92 टक्के आणि Outcomes – 94.28 टक्के असे गुण केंद्राला प्राप्त झाले आहेत. विशेषतः संसर्ग नियंत्रणासाठी 95.66 टक्के, क्लिनिकल सेवांसाठी 92.91 टक्के, गुणवत्ता व्यवस्थापनासाठी 92.92 टक्के आणि आरोग्य सेवांच्या परिणामकारकतेसाठी 94.28 टक्के गुण मिळाले आहेत.

*Core Standards मध्येही समाधानकारक कामगिरी*


NQAS मूल्यांकनातील Core Standards अंतर्गत Standard A2 मध्ये 83 टक्के, Standard B4 मध्ये 97 टक्के आणि Standard F6 मध्ये 96 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच Individual Standard-wise Score संदर्भातील निर्धारित निकषही पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने पूर्ण केले आहेत.

*रुग्ण समाधानाला प्राधान्य*.....आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करताना रुग्णांचा अनुभव आणि समाधान हा महत्त्वाचा घटक आहे. पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने Patient Satisfaction Score 4.7/5 प्राप्त केला आहे. त्यामुळे केंद्रामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबाबत समाधानकारक अनुभव असल्याचे अधोरेखित झाले आहे.

*स्वच्छता, रुग्ण सुरक्षा आणि गुणवत्ता व्यवस्थापनावर विशेष भर*...NQAS मानांकनासाठी पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध स्तरांवर गुणवत्ता सुधारणा करण्यात आली. स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध व आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता, प्रयोगशाळा सेवा, प्रसूती सेवा, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नोंद व्यवस्थापन, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले.

यासोबतच नियमित अंतर्गत गुणवत्ता तपासणी, प्रशिक्षण, मार्गदर्शन, आढावा बैठका आणि आवश्यक त्या सुधारणा यामुळे केंद्राला राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्यात यश आले आहे.

*जिल्ह्यातील NQAS उपक्रमाला मिळाले बळ*....जिल्हा परिषद ठाणेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय NQAS मानांकन मिळवून देण्यासाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील उर्वरित आरोग्य संस्थांनाही NQAS गुणवत्ता निकषांनुसार सक्षम करण्याचे काम सुरू असून, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा आरोग्य विभागाचा भर आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी माहिती देताना सांगितले की, “NQAS मानांकनासाठी आरोग्य संस्थांमध्ये विविध गुणवत्ता निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. यामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, रुग्णांचे अधिकार, क्लिनिकल सेवा, संसर्ग नियंत्रण, औषध व आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता, स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नोंद व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापन तसेच रुग्ण समाधान या बाबींचे मूल्यांकन केले जाते. पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने या सर्व बाबींमध्ये समाधानकारक कामगिरी करत 90.97 टक्के एकूण गुण प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे रुग्ण समाधानामध्ये केंद्राला 4.7 पैकी 5 गुण मिळाले आहेत. ही कामगिरी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्व संबंधितांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोगळेकर, डॉ. प्रज्ञेश पाटील, डॉ. साक्षी बुलबुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा मुळे, जिल्हा गुणवत्ता नोडल अधिकारी डॉ. नलिणी ठोंबरे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. नेहा पेठकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.‌”

गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवा ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यस्तरीय NQAS मानांकन प्राप्त करत 90.97 टक्के गुण मिळविले ही जिल्हा आरोग्य विभागासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक आरोग्य संस्थांनी गुणवत्ता मानांकन प्राप्त करावे, यासाठी जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला आणखी गती देण्यात येईल. - मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

०००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com