शाळेत आम्हाला असंच शिकवलं जातं की; गांधीजींनी आपल्या देशात 'सायमन कमिशन गो बॅक'चा नारा देऊन 'सायमन कमिशन'चा विरोध केला. पण हे शिकवलं जात नाही की; गांधीजींनी विरोध का केला? खरं म्हणजे सायमन कमिशनचं स्वागत करणारेही होते. पण स्वागत करणारे कोण होते? त्यांनी स्वागत का केलं? हे मात्र कधी शिकवलच नाही. ज्यांनी सायमन कमिशनचं स्वागत केलं; ते 1. पंजाबचे ओबीसी छोटूरामजी चौधरी सर, 2. उत्तर प्रदेशचे ओबीसी शिवदयाल चौरासिया; आणि 3. महाराष्ट्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आता येथे आपल्याला असा प्रश्न पडायला हवा की; गांधीजी सायमन कमिशनचा विरोध करीत असताना या लोकांनी त्याचे स्वागत का केले? आणि गांधीजींनी विरोध का केला?
याचे कारण म्हणजे; इ.स. 1917 मध्ये ब्रिटिशांनी एक आयोग स्थापन केला होता; 'साउथ बरो कमिशन' हा आयोग भारतातील शूद्र (OBC), आदिवासी (ST) भटके (NT) आणि अती शूद्र (SC) या संपूर्ण बहुजन हिंदू लोकांचे सर्वेक्षण द्वारे माहिती मिळवून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी स्थापन केला होता. हजारो वर्षांपासून वंचित असलेल्या या 85% लोकांना त्यांचे हक्क व अधिकार देण्यासाठी हा आयोग स्थापन झाला होता. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांना OBC कडून पाठवलं होतं आणि SC-ST कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कमिशनसमोर मागण्या मांडण्यासाठी गेले होते. पण ही गोष्ट गंगाधर टिळकांच्या बाळास आवडली नाही. त्यांनी कोल्हापूर जवळ अथनीच्या सभेत भाषण केलं होतं; "मराठा कुणबी संसदेत जाऊन नांगर चालवतील काय? तेली काय तेल काढतील का? कुंभार काय मडके घडवतील का? म्हणून त्यावेळी ब्रिटिश म्हणत होते की; ब्राह्मणांमध्ये बहुजन हिंदूंच्या प्रति न्यायवृत्ती (Judicial Character) बिलकुल नाही. ब्रिटिशांनी त्यांचं काही ऐकलं नाही. काही काळानंतर 1927 मध्ये पुन्हा 'सायमन कमिशन'ला भारतात सर्वेक्षण करण्यास पाठवलं. ब्रिटिशांनी असे ठरवले होते की; हा देश सोडण्यापूर्वी भारतातील हिंदू ओबीसी लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावं; यासाठी त्यांची लोकसंख्या व त्यांची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थिती जाणून घेणे आवश्यक होते. त्यासाठी हे सात सदस्यीय सायमन कमिशन होते.OBC, SC, ST या बहुजन हिंदू लोकांचं सर्वेक्षण करण्यासाठी जेव्हा हे कमिशन भारतात आलं; तेव्हा गांधीजी, लाला लजपतराय, नेहरू आणि RSS यांनी तीव्र विरोध केला. अनेक ठिकाणी 'सायमन कमिशन'ला काळे झेंडे दाखवले. लाला लजपतराय म्हणाले; “मी मेलो तरी चालेल; पण या शूद्र व अतिशूद्र लोकांना कोणताही हक्क मिळू देणार नाही. गांधींनीही लोकांना हे सांगून विरोध करायला लावला की; या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नाही. अर्थात; गांधींना असे म्हणायचे होते की; या कमिशनमध्ये एकही ब्राह्मण नाही. पण छोटूरामजी चौधरी सरांनी लाहोर रेल्वे स्टेशनवर जाऊन सायमन कमिशनचं स्वागत केलं. तसेच उत्तर प्रदेशातून शिवदयाल चौरसिया यांनी सुद्धा स्वागत केलं. डॉ. आंबेडकरांनी ब्रिटिशांना मदत करून सायमन कमिशनला योग्य ती अभ्यासपूर्ण माहिती दिली. यामुळे गोलमेज परिषदेत भारतातील हजारो वर्षांपासून शिक्षण, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वाचण्याचं, लिहिण्याचं, बोलण्याचं, ऐकण्याचं आणि धन मिळवण्याचं स्वातंत्र्य नाकारलेल्या बहुजनांना मतदानाचा अधिकार मिळाला. डॉ. आंबेडकरांनी संविधानात सुद्धा प्रथम 340 वे कलम OBC साठी बनवलं आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार देण्याची तरतूद केली. टिळक, लाला लजपत राय, गांधी या महान लोकांनी मात्र जीवित असे पर्यंत एकाही OBC व्यक्तीला संविधान सभेत जाऊ दिलं नाही.
आज पाऊणशे वर्ष झाले तरी आपल्या ओबीसिंना मताधिकार मिळाला पण मताचे खरे मूल्य आपण समजू शकलो नाही. म्हणूनच आजही आपण 3-4 % गुंड व बदमाश लोकांना निवडून देतो आणि त्यांच्या वर्चस्वात गुलामी करत असतो. सायमन कमिशनला विरोध करून ओबीसी बहुजन हिंदूंच्या हक्कांचा विरोध कोण कोण करीत होते? 1. डॉ. केशव बळीराम हेडगेवार (RSS चे संस्थापक) 2. मोहनदास करमचंद गांधी (गुजरातचे बनिया). 3. जवाहरलाल मोतीलाल नेहरू (काश्मिरी ब्राम्हण) आणि 4. लाला लजपत राय, (पंजाबी ब्राह्मण) हे लोक विरोध का करीत होते? कारण भारतात ते अल्पसंख्य आहेत. ते ग्रामपंचायत सरपंच सुद्धा बनू शकत नाही. म्हणूनच ते OBC, ST, NT, SC लोकांना शिक्षण, संपत्ती व मतदानाच्या अधिकारापासून वेगळे ठेवण्यासाठी शक्कल लढवत असतात आणि ओबीसी ला वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळू नये; यासाठी विरोध करत असतात. आज शाळेत जो इतिहास शिकवला जातो; तो अर्धवट व चुकीचा आहे. त्यामुळे ज्यांनी भारतातील ओबीसी बहुजन हिंदूंना न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी त्याग व संघर्ष केला त्या महापुरुषांना मात्र आपण विसरून गेलो. त्यांचा त्याग व संघर्ष आपण वाया घालवत आहोत. म्हणून माझ्या ओबीसी हिंदू बहुजन बांधवांनो, आपला खरा इतिहास जाणून घ्या. जो समाज आपला इतिहास समजून घेत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही व कायम गुलाम राहतो. हे लक्षात घ्या.
प्रा.डॉ. भीमराव गोटे
---------------------------------------
संघाची समरसता ती हीच. ब्राम्हणेतरांना ब्राम्हणवादी सत्ता जसे ठेवील तसे मुकाट्याने रहायचे. सत्ताधारी वर्गाशी समरस होऊन रहायचे. त्यांना प्रश्न विचारायचे नाही, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजा भागण्यासाठी मागणी करायची नाही. तशी मागणी केली तर लाथा आणि लाठ्या खाव्या लागतील. राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी करायची नाही. देशद्रोही म्हणून जेल मधे डांबण्यात येईल. शूद्र बहुजन शेतक-यांनी शेतमालाला MSP MINIMUM SUPPORT PRICE ची मागणी करायची नाही. मनुवादी सत्ताधारी जे कायदे लादतील ते मुकाट्याने लादून घ्यायचे, त्यामुळे बरबाद होत असाल तर बरबाद व्हावे पण त्यांना विरोध करायचा नाही. सरकारकडे रोजगार मागायचा नाही. हिंदुत्वाने हिंदूंना जातीत विभागणी केली आहे. सबब, आपापल्या जातीचा पारंपारिक व्यवसाय करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आणि उच्चवर्णीय सत्ताधा-यांची ( भटजी आणि शेठजी ) निष्काम सेवा करायची, तोच त्यांचा धर्म आहे. ते यासाठीच जन्माला आले आहेत या बद्दल शंका घ्यायची नाही. जर भटजी आणि शेठजी यांच्या मर्जीविरूध्द काही मागायचे धैर्य केले तर तुम्ही कितीही कर्तृत्ववान व देशभक्त असलात तरीही तुम्हाला देशद्रोही ठरवण्यात येईल व जेल मधे डांबण्यात येईल. समरसता म्हणजे सर्वांना सामावून घेणारी व्यवस्था नाही व समतेने, न्यायाने वागवणारी व्यवस्था नाही हे यावरून दिसून येईल.

0 टिप्पण्या