Top Post Ad

आरोग्य सेविका व आशा सेविकांचा आयुष्यमान, आभाकार्ड व N.C.D.चे काम न करण्याचा निर्णय

 मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने 16 जुलै 2026 रोजी लेखी कबूल केलेल्या मागण्या व उर्वरित मागण्या एका महिन्यात सोडविण्याचे दोन अतिरिक्त आयुक्त यांनी लेखी इतिवृत देऊन सुद्धा तीन महिने होऊन गेले तरी दोन अतिरिक्त आयुक्तानी लेखि स्वरूपात स्वाक्षरी करून दिलेले इतिवृत्ताची अंमलबजावणी केली नाही. परिणामी आरोग्य सेविका व आशा सेविका मध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे (1) आयुष्यमान कार्ड, (2) आभा कार्ड आणि (3) एन.सी.डी बाबतची अतिरिक्त कामे आरोग्य सेविका व आशा सेविका करणार नाहीत असे महापलिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, मुंबई या संघटनेच्या आरोग्य सेविका व मुंबई महापालिका आशा सेविका यांच्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या सभेत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.  

आरोग्यसेविकां व बीएमसी आशासेविका यांना किमान वेतन देण्याचा उच्च्य न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे. निवडणुकीच्या कामाबद्दल महापालिकेकडून महिना रुपये 12000 -/देण्यात येणार असे स्पष्ट मान्य केले पण दोन महिने होऊन गेले तरी ते अद्याप देण्यात आले नाही. तसेच इतर अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा दिला नाही तो तत्काळ देण्यात यावा.  पी एफ आयुक्त व ण्उघ्ऊ न्यायाधिकरणाने दिलेल्या निकाला प्रमाणे प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन देण्यात यावी. प्रसूती रजा देण्यात यावी.  बीएमसी आशा सेविका यांना कामाच्या आधारित मोबदला न देता किमान वेतन देण्यात यावे.  

 बीएमसी आशा सेविकांना आरोग्य सेविका व कालावधीचा बोनस पगाराच्या 20ज्ञ् देण्यात यावा. 2025-2026  बीएमसी आशा सेविकांना दर महिन्याला दहा तारखेच्या आत वेतन देण्यात यावे आरोग्यसेविकां व बीएमसी आशासेविका यांनी अतिरिक्त कामे करण्यास नकार दिल्यामुळे नागरिकांना होण्राया गैर सोई बद्दल बृहन्मुंबई मनपा प्रशासन यासाठी जबाबदार राहील तरी याबाबत संघटनेला चर्चेसाठी वेळ देण्यात यावी असेही पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com