महाराष्ट्र टपाल परिमंडळाने नागरिकांना आपल्या परदेशातील आप्तेष्टांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचवता यावा, यासाठी पोस्ट ऑफिसच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेच्या माध्यमातून आकर्षक व माफक दरात पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय टपाल विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र टपाल परिमंडळ, रामचंद्र जायभाये यांनी सर्वांना आनंदी, मंगलमय व समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा देताना. परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांना व मित्रांना घरचा फराळ आणि दिवाळीच्या भेटवस्तू पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
इंडिया पोस्टच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेद्वारे विविध देशांमध्ये १० किलो वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी उपलब्ध दर
१। जपान ₹४,७९७
२) जर्मनी ₹५,८७६
३) युनायटेड किंगडम (इंग्लंड) १६,४६१
४। फ्रान्स ₹६,६३८
५) रशिया ₹६,७५०
६। अमेरिका। १९,०५१
७। कॅनडा १९,६७६
८। ऑस्ट्रेलिया । ११,९१२
फराळ आणि भेटवस्तू व्यवस्थित व सुरक्षितपणे पाठविता याव्यात, यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनरल पोस्ट ऑफिस (GPO), मुख्य पोस्ट ऑफिस आणि निर्धारित पोस्ट ऑफिसमध्ये दर्जेदार पॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये फराळाच्या डब्यांचे जलद पॅकिंग करण्यासाठी आवश्यक उपकरणे बसविण्यात जाली आहेत. त्यामुळे काही मिनिटांत पॅकिंग करून पार्सल पुढील प्रक्रियेसाठी पाठविणे शक्य होते.
तुम्ही फराळ तयार करा, पॅकिंगची व्यवस्था पोस्ट ऑफिसवर सोपवा आणि दिवाळीचा गोडवा जगभर पोहोचवा! पोस्टमनच्या माध्यमातून मोफत घरपोच पिकअप ची सुविधा ! दैनंदिन कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पोस्ट ऑफिसमध्ये जाणे शक्य होत नसेल, तर नागरिकांसाठी पोस्टमनच्या माध्यमातून मोफत घरपोच पार्सल पिकअप ची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी : मुंबई क्षेत्रासाठी: १. हनुमंत चिरमे, सहाय्यक डाक अधीक्षक (मो. +९१ ९८७०१ ४३१३६) आणि विनोद पांचाळ, विपणन कार्यकारी (मो. +९१ ८८५०२६१६३४). नवी मुंबई क्षेत्रासाठीः २. प्रकाश मोरे, डाक निरीक्षक (मो. +९१ ९६०४८ २१६३४) आणि सुंदर राव, विपणन कार्यकारी (मो. +९१ ९६१९४ ५३५८६). यांच्याकडे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा.
पार्सल बुक करताना... परदेशात पार्सल वेळेत पोहोचण्यासाठी सीमाशुल्क घोषणापत्रात (Customs Declaration Form) फराळातील प्रत्येक वस्तूचा योग्य HSN कोड नमूद करणे आवश्यक आहे. फराळासोबत कपडे किंवा अन्य वस्तू पाठवित असल्यास त्यांचा तपशील, संबंधित HSN कोड आणि मूल्य स्वतंत्रपणे नमूद करावे. यामुळे परदेशातील सीमाशुल्क प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळण्यास मदत होईल.
परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांना घरच्या चकलीचा खमंगपणा, लाडवांचा गोडवा आणि आईच्या हातच्या फराळाची आठवण पोहोचविण्याची ही एक सुंदर संधी आहे. हजारो किलोमीटरचे अंतर असले, तरी आपुलकीचे नाते कायम जवळ ठेवण्याचे काम पोस्ट ऑफिसची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा करीत आहे.
दिवाळी म्हणजे आनंद, प्रेम, आपुलकी आणि गोडव्याचा सण घराघरांत तयार होणारा चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे अशा पारंपरिक फराळाचा आस्वाद घेतल्याशिवाय दिवाळीचा आनंद पूर्ण होत नाही. पण नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांना, नातेवाइकांना आणि मित्रपरिवाराला घरचा फराळ कसा पाठवायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो. आता काळजी कशाला? आपले हक्काचे पोस्ट ऑफिस आहे ना! या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोस्ट ऑफिस म्हणजे केवळ पत्रे पाठविण्याचे ठिकाण नव्हे, तर आपल्या माणसांशी नाते जोडणारा विश्वासाचा दुवा असल्याचे जायभाये यांनी सांगितले. या दिवाळीत आपल्या परदेशातील आप्तेष्टांना फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी खासगी पर्यायांचा विचार करण्यापूर्वी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला अवश्य भेट द्या. विश्वासार्ह टपाल सेवा, उपलब्ध पॅकिंग सुविधा आणि माफक दरांचा लाभ घ्या असे आवाहन रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.

0 टिप्पण्या