Top Post Ad

Thane प्रदीप पूर्णेकर हत्या; मानपाड्यातील नागरिकांचा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय

ठाण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची दिवसाढवळ्या त्यांच्याच परिसरात झालेल्या हत्येमुळे मानपाडा परिसर आजही अशांत आहे. सर्वपक्षीय सभेतून पुर्णेकर यांना आदरांजली वाहण्यात आल्यानंतरही या प्रकरणी पुर्णेकर कुटुंबियांनी ज्यांच्यावर शंका उपस्थित केली आहे. तसेच ज्यांच्या नावाचा एफआयआर मध्ये उल्लेख केला आहे. त्या माजी महापौर शिंदे कुटुंबियांबाबत मात्र पोलिसांनी मौन धारण केल्याने मानपाडा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध व्यक्त करीत पुर्णेकर यांच्या प्रती आदर व्यक्त करून मानपाड्यातील नागरिकांनी या वर्षीचा नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या उत्सवादरम्यान कोणतेही सांस्कृतीक कार्यक्रम अथवा गरबा-दांडीयां खेळण्यात येणार नसल्याचे मानपाड्यातील मंडळांनी जाहीर केले आहे. दरवर्षीचा उत्सव असल्याने केवळ भवानीमातेच्या र्म्तीची स्थापना आणि पूजा अर्चा एवढाच कार्यक्रम केला जाईल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याबाबत प्रदिप पुर्णेकर यांचे बंधूं जयनाथ पूर्णेकर यांनीही याबाबत मानपाड्यातील नागरिकांनी मुर्तीपुजा करण्याचे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.  

ठाण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची थंड डोक्याने, नियोजितपणे हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा पोलीस अधिकाऱयांनी सोमवारी न्यायालयात केला. ही हत्या सुपारी देऊन केल्याचेही अधिकाऱयांचे म्हणणे आहे.प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखिल यादव, नितेश पवार यांना अटक केली आहे. दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सुभाष याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष तपास पथकाने सोमवारी त्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी तपासासाठी आणखी नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करत आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयाला दिली.  

 या प्रकरणी अटकेतील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या याच्या पोलीस कोठडीत ठाणे न्यायालयाने आणखी पाच दिवसांची वाढ केली. त्याने गुन्हा घडल्यानंतर इतर आरोपींना पळून जाण्यासाठी कार उपलब्ध करून दिली असून गुह्याच्या वेळी संपर्क करण्यासाठी त्याने वापरलेले मोबाइल क्रमांक (सीमकार्ड) अन्य व्यक्तीच्या नावावर आहेत. घटनेच्या दहा दिवस अगोदर तो अन्य आरोपींच्या जवळपास 150 वेळा संपर्कात होता. ही बाब कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून समोर आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. हा आरोपी तपासात सहकार्य करत नसून या हत्येमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही.  

प्रदीप पूर्णेकर यांची थंड डोक्याने हत्या करण्यात आली असून या गुह्याबाबत जास्ती-जास्त पुरावे गोळा करणे बाकी आहेत. आरोपी सुभाष याच्याविरुद्ध पूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत, असेही यावेळी साळवी यांनी माहिती दिली. तसेच, सुभाष याची पोलीस कोठडी वाढवून देण्याबाबत काही कारणे देण्यात आली. त्यात प्रामुख्याने फरार संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अन्य एका आरोपीचा सुभाष याला ठावठिकाणा माहिती आहे. गुह्यात वापरलेली शस्त्रs संतोष याच्याकडे असल्याचे सुभाष याचे म्हणणे आहे. मात्र त्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. ही शस्त्रs जप्त करायची आहेत, या काही कारणांचा समावेश आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com