Top Post Ad

All India समता सैनिक दल, छ.संभाजीनगराच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

 ७ नोव्हेंबर  रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथम शाळा प्रवेश दिन,विद्यार्थी दिन म्हणून ऑल इंडिया समता सैनिक दल,डिव्हिजन औरंगाबाद छ.संभाजी नगराच्या वतीने पी ई सोसायटी च्या नागसेन वनातील लुबिनी उद्यानात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास जेष्ठ सैनिक नाथाजी वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करुन व अभिवादन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी छायाताई देहरे यांनी," डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकले  म्हणून त्यांनी मागासवर्गीय स्त्री पुरुषाना शिक्षण घेता आले.म्हणून आपण आपली प्रगती करू शकलो." असे विचार मांडले.तर हवालदार रमेश सावंत यांनीही आपले विचार व्यक्त करताना,"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजीबाबामहू येथें भारतीय सैन्यात सैनिकांना सैनिकी शिक्षण देत होते.ते संस्कार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाले होते, म्हणून  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 साली.महार रेजिमेंची स्थापना करुन अस्पृश्य समाजाला देशाच्या संरक्षणासाठी फौज उभी केली. म्हणून आम्हांला सैन्यात भर्ती होऊ शकलो.असे विचार मांडले.

तर समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर यांनी विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने विचार व्यक्त करताना म्हणाले की, "मराठवाड्यासारख्या मागास भागात पी ई सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कला,विज्ञान महाविद्यालय,विधी महाविद्यालयासारख्या अनेक शाळा महाविद्यालयाची निर्मिती करुन शिक्षणाचा प्रचार प्रसार करुन तसेच देशातl सामाजिक, धार्मिक शैक्षणिक परिवर्तन घडवून आणले म्हणूनचं आपली प्रगती होऊ शकली.हे सर्व उच्य शिक्षणाच्या सामर्थ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे करू शकले. तसेच विदेशात जाऊन 32 प्रकारच्या उच्य शिक्षणाच्या पदव्या मिळवून स्वतंत्र भारताची घटना लिहून भारतीय समाजाला समता,स्वातंत्र्यं,बंधुभाव आणि न्याय यां तत्वाने देशाची लोकशाही बळकट केली.म्हणून देशात सामान्य माणूस सुरक्षित आहे.असे विचार मांडले."

यावेळी समता दैनिक दलात नव्याने आलेल्या नवागतांचे समता दैनिक दलाचे कंपनी कमांडर सुभेदार विलास सिरसाट साहेब यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौतम त्रिभुवन,रमेश वाघमारे,कुमार जयेश प्रदीप त्रिभुवन यांचे स्वागत केले.तर महिला कमांडर कमलताई खरात यांनी कविताबाई गायकवाड,वाळूज महानगाराच्या प्रमुख संगीताताई भगत, अंजनाताई काकडे,सविताबाई काळे,मीनाबाई वाघमारे, जिगीषा किशोर त्रिभुवन,सांची प्रदीप त्रिभुवन , पियुषा किशोर त्रिभुवन यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करुन स्वागत करण्यात आले.

.     यावेळी समता सैनिक दलाचे जी ओ सी सुभेदार मेजर बाजीराव सोनुने साहेब,कंपनी कमांडर सुभेदार विलास सिरसाट साहेब,हवालदार भारत काकडे साहेब,बी.वाय तायडे साहेब,हवालदार रमेश सावंत साहेब,हवालदार मदन भगतसाहेब,दलाचे कार्याध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर,सचिव प्रवीणकुमार साळवे कोषाध्यक्ष भीमराव घोरपडे,जेष्ठ सैनिक नाथाजी वीर,रमेश वाघमारे,इत्यादी सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवालदार भारत काकडे,कारभारी त्रिभुवन,प्रवीणकुमार साळवे भीमराव घोरपडे,यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com