Top Post Ad

महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय लष्कराच्या नौकानयन विभागाकडून प्रशिक्षण


 मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या निवडक विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने भारतीय लष्कराच्या नौकानयन (यॉटिंग) विभागाकडून निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी  महानगरपालिका आणि लष्करी नौकानयन विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा गिरगाव चौपाटी संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्य सचिव डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील उच्चस्तरीय समितीचे यासाठी सहकार्य लाभले आहे.या प्रशिक्षणाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा भवन परिसरात २० सप्टेंबर रोजी पार पडला.     याप्रसंगी उपायुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त. मनीष वळंजू, गिरगाव चौपाटी संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्या श्रीमती इंद्राणी मलकानी, कर्नल अमेय हुमनाबादकर, कर्नल आनंद व इतर मान्यवर उपस्थित होते.      


    महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहे. या धर्तीवर नौकानयन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.     विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने भारतीय लष्कराचे नौकानयन (यॉटिंग) प्रशिक्षण देण्याबाबत लष्करी नौकानयन विभाग आणि  महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटी संदर्भातील उच्चस्तरीय समितीने या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. 

     या करार अंतर्गत  महानगरपालिकेच्या वतीने प्रशिक्षणासाठी बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागील बाजूस तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, याठिकाणी पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांचीही पूर्तताही करण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक बोटी आणि अन्य संसाधनांची उपलब्धता तसेच प्रशिक्षकांची नेमणूक लष्करी नौकानयन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.   या उपक्रम अंतर्गत नौकानयनाची आवड असणाऱ्या, तसेच या प्रशिक्षणासाठी निश्चित सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी नुकतीच पार पडली असून त्यांना आता प्रशिक्षकांमार्फत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाईल.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com