Top Post Ad

बॉम्बे आर्ट सोसायटीला बळ देण्यासाठी व अनियमततेच्या विरोधात "संकल्प पॅनेल"

'बॉम्बे आर्ट सोसायटी' या १८८८ साली स्थापन झालेल्या कला संस्थेच्या नवीन कार्यकारिणीसाठी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणुक होत आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला बळ देण्यासाठी व अनियमततेच्या विरोधात एकत्र येत अनेक सभासदांच्या मागणीनंतर "संकल्प पॅनेल" २६ कलमी वचनबध्द कार्यक्रम जाहीर करीत निवडणुकीसाठी उतरले आहे. विद्यमान पदाधिकारी सुमारे १५ वर्षापासून कार्यरत आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून या संस्थेने, अनेक स्थित्यंतरे, अडी-अडचणी, चढ-उतार आणि बरेच कांही कटु सत्य अनुभवलेले आहेत. प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी आणि प्रत्येक सजग कलाकाराच्या कला प्रज्ञेला उर्जा देण्याच्या इरा‌द्याने प्रामाणिक, पारदर्शक विचारांचे संस्कार असलेल्या आजीव सदस्यांनी, संस्थेचे "पुनरुज्जीवन" करण्याचा संकल्प यावेळी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कला संस्था असलेल्या या संस्थेला पुन्हा उदयास आणून भारतीय संस्कृतीचा "आयकॉन" बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची जिद्द यातून दिसून येत आहे.

२००२ पर्यंत ही संस्था जहांगीर आर्ट गॅलरीच्या एका छोट्याशा खोलीत बंदिस्त होती. आता अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या  विजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळी नविन दमाच्या पॅनेलला यश मिळाल्यानंतर २०१० पर्यंत या पॅनलमधील लोकांनी या संस्थेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला होता. म्हाडाने काढून घेतलेला प्लॉट परत आणण्यापासुन ते बांद्रा येथील कलासंकुलाचे काम, लाइफ टाईम अॅवॉर्डसह इतरही महत्त्वाच्या अॅवॉर्डसची संख्या वाढवून सोसायटीच्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या समारंभाच्या वेळी प्रदान करण्यास सुरुवात केली होती. परंतु २०१० नंतर निवडून आलेल्या लोकांनी २०२६ पर्यंत म्हणजे तब्बल १५ वर्षे या सोसायटीवर कार्यरत राहुनही कांहीही काम केले नाही. १८८८ साली ज्या उ‌द्देशाने ही संस्या स्थापन झालेली होती आणि भारतीय इतिहासात संख्येचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते त्या प्रतिष्ठेला १५ वर्षात अधोगतीला पोहोचवले गेले आहे. १३८ वर्षांच्या सार्वजनिक न्यास असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटी या कलासंस्थेला बळ देण्यासाठी आणि  नवसंजीवनी बहाल करण्यासाठी नवनिर्मितीचा संकल्प जाहीरनामा घेऊन "संकल्प पॅनेल" कला आणि कलावंतासाठी ठोस कृती कार्यक्रम घेऊन पुढे आली आहे. 

हौशी आणि युवा कलावंतांसाठी नियमित, दर्जेदार कला-प्रकाशने व डिजिटल पोर्टफोलिओ प्रकाशन, कला सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी इतर शहरात कला-उत्सव आणि शिबिरांचे आयोजन, कला क्षेत्रातील व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर अधिकृत भूमिका आणि प्रसंगी आंदोलन. साहित्य संमेलनाच्या धर्तीवर देश-विदेशात वार्षिक भव्य कला संमेलन आणि परिसंवादाचे आयोजन, कला शिक्षण पद्धतीतील बदलांबाबत सरकार दरबारी पाठपुरावा आणि जागरूकता यासाठी शिक्षण सुधारणा, महिला कलावंतांसाठी स्वतंत्र, विशेष प्रदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ, ज्ञान-संवाद होण्यासाठी ज्येष्ठ आणि विशेष कलावंतांची प्रात्यक्षिके आणि विचारवंतांची व्याख्याने, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीकोनातून देश-विदेशातील आर्ट गॅलरीजसोबत टाय-अप आणि कलाकार निवासी (Residency) कार्यक्रम, नैसर्गिक आपत्ती किंवा वैद्यकीय गरजेच्या वेळी गरीब व गरजू कलावंतांना तातडीची आर्थिक मदत व्हावी यासाठी कलावंत कल्याण निधीची स्थापना, कलावंत आणि कला-विद्यार्थ्यांसाठी पुरस्कारांची संख्या आणि शिष्यवृत्तींमध्ये भरीव वाढ, ऑडिट न झालेल्या सर्व वर्षाचे नियमाप्रमाणे ऑडिट करून ते पारदर्शकरित्या सर्वांसमोर ठेवण्यात येइल. 

अनियमिततेसाठी जबाबदार व्यक्तीवर नियमाप्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना कारवाई करण्याबाबत व वसुली करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येईल,  ट्रस्टचा सर्व निधी योग्य व विहित मार्गाने जास्तीत जास्त  वाढवून  त्याचा कला व कलाकारांच्या हितासाठी वापर, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित व्यासपीठ उपलब्ध करून कला व कलाकारांच्या उत्तम प्रचार आणि प्रसारासाठी सर्वसमावेशक फिजिकल व डिजिटल प्रसिद्धी साहित्य निर्माण केले जाईल, सर्व सभासदांनचे पाच वर्षातून एखादे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, बॉम्बे आर्ट सोसायटी आर्ट फेस्टिवल सुरू करण्याची प्रथा निर्माण केली जाईल, चित्रकारास चित्र प्रदर्शन भरविण्यास शासनाकडून अनुदान मिळण्याकरिता प्रयत्न करणार, जेष्ठ दृश्य कलाकारांना शासना मार्फत पेन्शन सुविधा तसेच प्रयोगशील आणि गरजू दृश्य कलाकारांना आर्थिक मदत कशा प्रकारे करता येईल यावर सकारात्मक प्रयत्न आपण करणार, संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय, कला संग्रहालय, आणि प्रतिथयश कलाकारांसह दुर्मिळ कलाकृतींच्या लिलावाचे काही सेवा-शर्ती-नियम-अटींच्या अधीन राहूनआयोजन करणे,

असा सकारात्मक आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा प्राधान्याने विचार करीत २६ कलमी कार्यक्रम जाहीर करीत प्रा. विजय राऊत (अध्यक्ष)- अमरावती,  डॉ. गजानन सिताराम शेपाळ (सचिव) प. महाराष्ट्र, श्रीमती भावना सोनवणे (खजिनदार) सोलापूर / प. महाराष्ट्र, श्री. विठ्ठलराव बी. लोखंडकर (सदस्य)- मुंबई, प्रा. नंदकिशोर मानकर (सदस्य)- नागपूर, श्री. अश्विन कदम (सदस्य)- पुणे, प्रा. संजय साबळे (सदस्य)- नाशिक, प्रा. दिपक रमेश पाटील (सदस्य) खोपोली / कोकण / खानदेश, डॉ. मिनल राजुरकर (सदस्य)- नवी मुंबई, प्रा. रमेश भोसले (सदस्य)- पुणे यांनी "अनियमिततेला नियमित करून कायद्याच्या चौकटीत बद्ध करण्यासाठी आवाहन केले आहे.
- प्रा.विजय राऊत  ९५४५०००२४०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com