सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांकडून दडपशाहीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले, सरकारने काहीही केले तरी आम्ही एससी एसटीचे हक्काचे ₹४६०१.१३ रुपये परत मिळे पर्यंत शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्र वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. अनुसूचित जाती घटकातील ३५९४.०३ कोटी आणि अनुसूचित जमाती घटकातील १००७.१० कोटी, असा एकूण ४६०१.१३ कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळविण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती-जमातींचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक- आर्थिक विकास तसेच दलित व आदिवासी वस्ती विकासासाठी वापरला जाणे अपेक्षित असल्याचा दावा यावेळी आंदोलकांनी केला.
15,000 कोटी स्पेशल फंड म्हणून ठेवला असताना, 2.5 कोटी लाभार्थी होते, 29,000 कोटींची आर्थिक तरतूद होती, तरीसुद्धा दर महिन्याला एससी-एसटीच्या निधीतून 443 कोटी रुपये वळते का करण्यात आले? जर सरकारकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जेवढ्या होत्या, त्यापेक्षा अधिकचा निधी होता, तो न वापरता त्याचा काय घोटाळा केला, हे महाराष्ट्राच्या जनतेला सरकारने सांगावे. - : राजेंद्र पातोडे. प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

0 टिप्पण्या